• Story 1
  • Story 2
  • Story 3
  • Story 4
  • Story 5

भाजपाचे ज्येष्ठ नेते अँड. रंगनाथराव कातळे यांचेदुःखद निधन -अँड रंगनाथरावां यांचे योगदान न विसरण्या जोगे :- भा ज पा युवा नेते ऋषिकेश कराड


 रेणापूर - माजी जिल्हा परिषद सदस्य प्रा अर्चना कातळे यांचे पिताश्री रेणापूर येथील राजकीय, सामाजिक आणि सहकार क्षेत्रात भरीव काम केलेले रेणापूर सेवा सहकारी सोसायटीचे माजी चेअरमन तथा रेणापूर ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच अँड. रंगनाथरावजी कातळे यांचेवर गुरुवारी दुपारी रेणापूर येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 लोकनेते स्व. गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्या सोबत अनेक वर्ष काम केलेले भारतीय जनता पार्टीचे जेष्ठ नेते अँड. रंगनाथराव कातळे हे गेल्या काही दिवसापासून आजारी होते. गुरुवारी पहाटे चारच्या सुमारास त्यांचे दुःखद निधन झाले. रंगनाथआप्पा नावाने ते सर्वदूर परिचित होते. स्वर्गीय कातळे यांच्यावर रेणापूर येथील सार्वजनिक स्मशानभूमीत गुरुवारी दुपारी आचार्य ओमप्रकाशजी शास्त्री यांच्या वैदिक मंत्रोच्चारात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी स्व. कातळे यांचे लहान बंधू रावसाहेब कातळे यांच्यासह मुली रंजना शेंडगे, संगीता कापसे, सिंधू गाडे, मंजुषा आपेट आणि अर्चना टेंगसे यांनी अग्नी दिला. 
         रेणापूर येथील राजकीय, सामाजिक आणि सहकार क्षेत्रात अँड रंगनाथराव कातळे यांनी भरीव काम केले आहे. रेणापूर सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन आणि रेणापूर ग्रामपंचायतचे उपसरपंच म्हणून अँड. रंगनाथराव कातळे काम केले असून गोरगरीब सर्वसामान्यांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी तत्पर असणाऱ्या रंगनाथआप्पा यांच्या कार्याची सतत सर्वसामान्यातून चर्चा होते. अंत्यविधीस गंगाखेड येथील संत जनाबाई महाविद्यालयाचे अध्यक्ष प्रा आत्माराम टेगसे, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लातूर ग्रामीण विधानसभा अध्यक्ष भाजपा युवा नेते ऋषिकेश कराड, लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष प्रमोद जाधव, भाजपाचे तालुकाध्यक्ष दशरथ सरवदे, रेणापूरचे माजी नगराध्यक्ष अभिषेक आकनगिरे, वकील संघाचे श्रीकांत सूर्यवंशी यांच्यासह रेणापूर आणि परिसरातील राजकीय सामाजिक क्षेत्रातील मान्यवर, विविध संस्थांचे आजी-माजी लोकप्रतिनिधी, भाजपाचे पदाधिकारी सर्व स्तरातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने