महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री माननीय नामदार श्री प्रकाशजी आबिटकर साहेब यांचा लातूर जिल्हा दौरा.
लातूर जिल्ह्यातील औसा निलंगा देवणी व शिरूर अनंतपाळ या तालुक्यातील उपजिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख ,शहर प्रमुख, उपशहर प्रमुख, उपतालुकाप्रमुख, विभाग प्रमुख ,उपविभाग, प्रमुख तसेच महिला आघाडी, युवासेना, शिव सहकार सेना, मागासवर्गीय सेना, शेतकरी सेना राष्ट्रीय कर्मचारी सेना, अध्यात्मिक सेना या अंगीकृत संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांना सुचित करण्यात येते की महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री माननीय नामदार श्री प्रकाशजी अबिटकर हे दिनांक 24 जुलै 2025 रोजी लातूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत .
दिनांक 24 जुलै 2025 रोजी सकाळी नऊ वाजता लातूर जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत. तसेच आढावा बैठक काही सूचना शिवसैनिकाच्या अडीअडचणी समजून घेऊन यावर काय मात करता येईल याबाबत उपाययोजना करणार आहेत. या आढावा बैठकीसाठी शिवसेनेचे उपनेते तथा मराठवाडा संपर्क नेते श्रीमान आनंदराव जाधव तसेच शिवसेनेचे उपनेते मा. आमदार श्रीमान ज्ञानराज चौगुले शिवसेना लातूर जिल्हा संपर्कप्रमुख श्रीमान बालाजीराव काकडे महिला आघाडीच्या लातूर जिल्हा संपर्कप्रमुख सौ. रंजनाताई कुलकर्णी उपस्थित राहणार आहेत. सन्माननीय प्रकाशजी आबिटकर हे लातूर जिल्ह्यासाठी संपर्क मंत्री म्हणून शिवसेनेचे मुख्य नेते तथा महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री माननीय नामदार एकनाथ शिंदे यांच्या आदेशावरून नियुक्ती झालेली आहे .
याच अनुषंगाने सन्माननीय मंत्री महोदय प्रकाशजी आबिटकर महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री हे लातूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून सर्व पदाधिकाऱ्यांशी सकाळी नऊ वाजता संवाद साधणार आहेत तरी वरील सर्व पदाधिकाऱ्यांनी सकाळी नऊ वाजता शासकीय विश्रामगृह लातूर येथे उपस्थित रहावे.
जय महाराष्ट्र
आपला
शिवाजी माधवराव माने
शिवसेना जिल्हाप्रमुख लातूर
Tags
द महाराष्ट्र न्यूज