• Story 1
  • Story 2
  • Story 3
  • Story 4
  • Story 5

लातूर ग्रामीणची भाजपचा बालेकिल्ला अशीच ओळख निर्माण व्हावी;आजपासून कामाल लागावं :-आमदार रमेशअप्पा कराड.

      लातूर दि.३०- विधानसभेची निवडणूक जिंकली एवढ्यावरच न थांबता येणाऱ्या काळात होणाऱ्या ग्रामपंचायत सोसायटीसह स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सर्व निवडणुका आपल्याला जिंकायच्या आहेत आणि लातूर ग्रामीण मतदार संघाची भाजपाचा बालेकिल्ला म्हणून ओळख निर्माण करायची आहे यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी आजपासूनच कामाला लागावे अशी सूचना नवनिर्वाचित आमदार रमेशआप्पा कराड यांनी दिल्या.
 लातूर ग्रामीण विधानसभा मतदार संघातून भाजपा महायुतीचे उमेदवार आ. रमेशआप्पा कराड यांचा घवघवीत यश संपादन केल्यानंतर आज शनिवारी लातूर येथील भाजपाच्या संवाद कार्यालयात पोहरेगाव जिल्हा परिषद मतदार संघातील भाजपासह महायुती कार्यकर्त्यांच्या वतीने जाहीर सत्कार करून अभिनंदन करण्यात आले. यावेळी भाजपाचे विधानसभा अध्यक्ष अनिल भिसे, तालुकाध्यक्ष अँड दशरथ सरवदे, शिवसेनेचे युवा जिल्हाध्यक्ष कुलदीप सूर्यवंशी, अध्यात्मिक आघाडीचे जिल्हा संयोजक ज्ञानोबा भिसे, माजी तालुकाध्यक्ष रामराव मोरे, विठ्ठल कस्पटे, श्रीकृष्ण पवार, सुभाष वाघ, संगमेश्वर स्वामी यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती. या सत्कार कार्यक्रमास पोहरेगाव जिल्हा परिषद मतदार संघातील गावा गावातील भाजपा सह महायुतीचे कार्यकर्ते मतदार नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 प्रत्येक कार्यकर्त्यांनी स्वतः उमेदवार समजून काम केले केलेल्या प्रयत्नाला यश आले याबद्दल सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करून यावेळी बोलताना आ. रमेशआप्पा कराड म्हणाले की, लातूर ग्रामीण मतदार संघातून देशमुख पराभूत होतील असे कोणालाच वाटत नव्हते मात्र ही लढाई आपण जिंकणार याचा मला आत्मविश्वास होता कार्यकर्त्याच्या मेहनतीमुळेच हे शक्य झाले. ही निवडणूक धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी होती देशमुख यांनी अनेकांना विकत घेण्याचा प्रयत्न केला माझा गरीब कार्यकर्ताच काय तर सामान्य मतदारही विकला गेला नाही. सत्ता आणि पैशाच्या मागे जनता जात नाही विकास कामामागे जनता असते हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. काँग्रेस पुढार्‍याच्या अनेक गावात सामान्य कार्यकर्त्यांनी भाजपाला मताची आघाडी मिळवून दिली याचा मला अभिमान आहे.
        विधान परिषदेचा आमदार या नात्याने काम करत असताना मतदारसंघात शेकडो कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आणि गावातील विकास कामांना गती दिली आपण केलेल्या कामामुळेच गावा गावात कार्यकर्त्यांच्या शब्दाला मतदारांनी मान दिला आणि भाजपाच्या पाठीशी राहून भरभरून मतदानरुपी आशीर्वाद दिले. आता विधानसभा आमदारकीच्या माध्यमातून मिळालेल्या संधीचं सोनं करून दाखवू असे सांगून आ. रमेशआप्पा कराड म्हणाले की, मतदार संघात गेल्या पंधरा वर्षातील विकासाचा मोठा बॅकलॉग भरून काढायचा आहे यासाठी विकासाचा आराखडा तयार करून विविध कामांना निश्चितपणे मंजुरी मिळून घेऊ. कार्यकर्त्यांनीही सर्व समाज घटकांना सोबत घेऊन गोरगरीब जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करावेत कोणाचीही अनुरूप होणार नाही याची काळजी घ्यावी पर्यायाने आपल्या गावचा तालुक्याचा आणि मतदारसंघाचा सर्वांगीण विकास साधू असेही त्यांनी बोलून दाखवले. प्रारंभी पोहरेगाव जिल्हा परिषद मतदार संघातील अनेकांनी आपले मनोगत व्यक्त करून भविष्यातील कार्याला शुभेच्छा दिल्या.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने