1️⃣ लातूर शहरातील अहिल्याबाई होळकर चौक 5 ते जिवाजी महाले (चौक गरुड) चौक दरम्यान राष्ट्रीय महामार्ग 361 आणि राष्ट्रीय महामार्ग 548 B या दोन राष्ट्रीय महामार्गाला जोडणाऱ्या रस्त्याचे मिसिंग लिंक म्हणून चौपदरीकरण करावे.
2️⃣ लातूर ते जहीराबाद (752 K)या राष्ट्रीय महामार्गाला ठिकठिकाणी तडे गेले आहेत, साईड पट्ट्या खचल्या आहेत, नाल्याचे काम व्यवस्थित झाले नाही , त्यामुळे संबंधित कंत्राटदाराकडून ते काम दुरुस्त करून घ्यावे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 63 ची सुपर लिंक म्हणून
शिरूर ताजबंद ते उदगीर या रस्त्याचे बांधकाम करावे
आदी मागण्यांची निवेदने त्यांना सादर केली.
3️⃣ पुणे - सोलापूर - हैदराबाद (NH 65) या महामार्गावरील वाहतूक आता खूप वाढली आहे परिणामी प्रवासाचा वेळ अधिक झालाय, अपघातही होत आहेत त्यामुळे या महामार्गाचे रुंदनीकरण नव्याने करायला हवं ही बाब सुद्धा चर्चेमध्ये आणली आणि या संदर्भामध्ये नव्याने सर्वेक्षण करण्यासंदर्भामध्ये मंत्री महोदयांनी सूचना दिल्या. विशेषतः उमरगा फाटा येथील कामे कासवगतीने सुरू आहे त्यांच्यामुळे प्रवाशांचे हाल होतात त्या संदर्भामध्ये सुद्धा त्यांनी कडक कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्याआहेत, हा जो महामार्ग आहे याची रुंदी आणखी वाढेल आणि भविष्यामध्ये तो आठ पदरी दहा पदरी होईल अशी अपेक्षा आहे.
4️⃣ महाराष्ट्रातील आणि देशातील साखर उद्योगासंदर्भानेही यावेळी चर्चा झाली, साखरेच्या हमीदराच्या संदर्भामध्ये मंत्रीमहोदयांचे लक्ष वेधले, केंद्र सरकारच्या स्तरावर या संदर्भाने चर्चा सुरू आहेत त्यास आणखीन गती देण्यात येईल अशी ग्वाही त्यांनी दिली
5️⃣ इथेनॉलच्या दराच्या दरामध्येही अशाच पद्धतीने वाढ करण्याच्या संदर्भाने मागणी त्यांच्याकडे नोंदवली, साखर आणि इथेनॉल याचे हमीदर वाढले तर एकंदरीतच साखर उद्योगाला मोठा दिलासा मिळेल आणि देशांमध्ये आणि राज्यातील साखर कारखान्याकडे असलेली थकबाकी कमी होईल. शिवाय शेतकऱ्यांना वाढीव एफआरपी देता येईल हीबाब चर्चेदरम्यान अधोरेखित केली
6️⃣ मराठवाड्यातील लातूर, बीड, धाराशिव या जिल्ह्यामध्ये ऑटोमोबिल इंडस्ट्री,
ऑटोमोबिल इंडस्ट्री क्लस्टर विकसित करावी अशी विनंती देखील मंत्रिमहोदांकडे यावेळी नोंदवली. महाराष्ट्र सरकारकडे ही मागणी अगोदरच नोंदवण्यात आलेली आहे असे सांगून केंद्राने यात लक्ष घालावे अशी विनंती केली.
7️⃣ सर्वचठिकाणी आता ई मोबिलिटी मोठ्या प्रमाणामध्ये नावारूपाला येते आहे त्यामुळे लातूर, बीड, धाराशिव या जिल्ह्यात ई मोबिलिटी सेक्टर झोन विकसित झाले तर खऱ्या अर्थाने या भागात मध्ये दरडोई उत्पन्न वाढण्यास मदत होईल. सुशिक्षित बेकारांच्या हाताला काम मिळेल उपजीविकेसाठी होणारे स्थलांतर रोखण्यामध्येही यामुळे काही प्रमाणामध्ये आपल्याला यश मिळेल असे सांगून केंद्र आणि राज्य सरकार या संदर्भामध्ये ठोस पावलं उचलेल आणि या दुष्काळी भागाला न्याय देण्यासंदर्भामध्ये भूमिका बजावेल अशी अपेक्षा व्यक्त केली,
मंत्रीमहोदयांकडे सादर केलेली निवेदने आणि चर्चेदरम्यान उपस्थित केलेल्या मुद्द्यावर त्यांनी अनुकूल प्रतिसाद दिला, केलेल्या घोषणा आणि तातडीने करावयाच्या बाबी याबाबत त्यांनी संबंधितांना यावेळी सूचनाही केल्या, काही विषयावर मार्गदर्शनही केले, एकूण भेट आणि चर्चा सकारात्मक ठरली.
Tags
The महाराष्ट्र News