• Story 1
  • Story 2
  • Story 3
  • Story 4
  • Story 5

शेतकऱ्यांचे आर्थिक जीवनमान उंचावणाऱ्या मांजरा परिवाराची वाटचाल आता ग्रीन रिफायनरीकडे सुरू -माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख.

लातूर प्रतिनिधी...मांजरा परिवारातील देवणी तालुक्यातील तळेगाव (भो) येथील जागृती शुगर कारखान्यात प्रतिदिन 7 टन क्षमता असलेल्या कॉम्प्रेस्ड बायोगॅस (सीबीजी) प्रकल्पाचा शुभारंभ तसेच चालू गळीत हंगामातील 2 लाख 75 हजार साखर पोत्यांचे पूजन कारखान्याचे संस्थापक चेअरमन तथा माजी मंत्री आदरणीय दिलीपराव देशमुख साहेब यांच्या व माझ्या हस्ते आज झाले.
शेतकऱ्यांचे आर्थिक जीवनमान उंचावणाऱ्या मांजरा परिवाराची वाटचाल आता ग्रीन रिफायनरीकडे सुरू आहे. शेतकऱ्यांना अधिकचे पैसे मिळावेत म्हणून इथेनॉल, बायो-सीएनजी प्रकल्प सुरू केले. मांजरा परिवार सध्या हरित इंधन क्षेत्रात अग्रेसर आहे. येणाऱ्या काळात हरित ऊर्जा क्रांती करू, असा विश्वास व्यक्त केला.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने