• Story 1
  • Story 2
  • Story 3
  • Story 4
  • Story 5

पोलीसांनी तपासात हालगर्जीपणा करुण आरोपींची संख्या कमी दाखवुन आरोपींना केले सहाकार्य.:-सकल धनगर समाज


पोलीसांनी तपासात हालगर्जीपणा करुण आरोपींची संख्या कमी दाखवुन आरोपींना  सहाकार्य केल्याची धक्कादायक बाब सकल धनगर समाजाच्या वतीने उघडकीस आणण्याचा धाडसी प्रयत्न. सकल धनगर समाज जिल्हाआध्यक्ष अनिल गोयकर यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी यांना दिले निवेदन.

लातूर मौजे, टाकळी (बु )येथे मयत
माऊली उमाकांत सोट (वय 18) या तरुणाला गावातीलच मराठा सामाजाच्या दहा ते बारा लोकांनी लोकांनी घरी बोलावुन रात्री ठीक
9 च्या सुमारास आरोपींच्या घरासमोरच जबर लाठी काठी, गाडीचे शॉकपजर, रॉड ने जीवे मारण्याच्या उद्देशाने दीड तास रिंगण करुण
जबर मारहाण केली आरोपींनी नंतर मुलाच्या घरी जाऊन मुलाच्या आई, वडील व भावास लाठी काठी व शॉकपजरने मारहाण केली
व तुमच्या मुलाला आम्ही मारुण टाकलेले आहे तुम्हालापण मारुण टाकतो असे सांगुण त्याला तुम्ही घेवुन जाण्यास सांगीतले यावेळी
गावचे सरपंच विलास उपाडे व रुद्रस रमेश सोट व इतर लोक त्यांच्याकडे घटनास्थळी गेले असता कमलाकर डुरे, गोपाळ डुरे, गोवद
डुरे, शिवाजी ऊर्फ ओम खेडकर, मनोज ऊफाडे, कुमार ऊफाडे, बालाजी खेडकर, रंगनाथ डुरे व इतर आरोपींनी मारलेल्या मुलास
दवाखाण्यात नेण्यासाठी मज्जाव केला व त्यावेळी तो तरुण आरोपीच्या घरासमोरच वेदणेने वव्हळ पडला होता त्यावेळी त्या मुलाने पाणी
मागीतले असता आरोपींनी त्याला लघुशंका पाजली त्यानंतर आरोपीनीच पोलीसांना फोन केला नंतर तब्बल 2 तासानंतर 12 वा.
पोलीस घटनास्थळी आल्यानंतर आरोपींनी त्या मुलास दवाखाण्यात नेऊ दिले तेथे डॉक्टरांनी सीरीअस असल्यामुळे त्याचे सर्व हातपाय
मोडले व इतर शरीरातील हाडे मोडले असल्यामुळे ऑपरेशन करावे लागेल असे सांगीतले परंतु दोन दिवसानंतर माऊली उमाकांत सोट
हा कोमामध्ये गेला दोन महिणे दवाखाण्यामध्ये राहिल्यानंतर डॉक्टरांनी कोमामध्ये असतानाच घरी पाठवले आणी घरी आल्यानंतर 12
दिवसानंतर माऊली उमाकांत सोट हा दि. 06/01/2025 रोजी पहाटे दवाखाण्यात नेत असताना मरण पावला.
तरी या प्रकणामध्ये पोलीसांनी प्रत्यक्ष घटनास्थळी आल्यानंतर दवाखाण्यात जाउन पीडीत मुलाचा जबाब घ्यायला पाहिजे होता
परंतु तो घेतला नाही तोपर्यंत पीडीत दोन दिवसानंतर कोमामध्ये गेला तो शेवटपर्यंत शुध्दीवर आलाच नाही याचा गुन्हा 31/10/2024
एसपी ऑफीसला तक्रार दिल्यानंतर 01/11/2024 रोजी नोंद होवुन देखील 6 आरोपींनी अटकपूर्व जामीणासाठी अर्ज केल्यानंतर
आरोपीवर 307 साराखे गंभीर गुन्हा नोंद होवुन देखील (उदा) बीड मधील संतोष देशमुख प्रकरण उघडकीस आल्यानंतर आरोपींना तब्बल दीड
महिण्यानंतर पोलीसांनी अटक केली त्यानंतर एकाच प्रकरणामध्ये दोन आरोपीना पीसीआर घेण्यात आला व बाकीचे चार आरोपींना
एमसीआर त्यामुळे या प्रकरणामध्ये पोलीसांच्या अक्षम्य चुका झालेल्या असून खरे आरोपी अजुनही मोकाटच फिरत आहेत व पीडीत
कुटूंब भयभीत होवुन दहशतीखाली जगत आहेत तरी मे. साहेबांनी उर्वरीत आरोपींना तात्काळ अटक करावी पीडीत कुटूंबाला पोलीस
संरक्षण द्यावे आणी आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावे या प्रकणामध्ये जे काणी दोषी तपास अधीकारी असतील त्यांना तात्काळ
निलंबीत करुण ही केस इतर निपक्षपातीपणे तपास करणा-या सीआडी सारख्या यंत्रणेकडे देण्यात येवून पीडीत कुटंबाला न्याय द्यावा
अन्यथा महाराष्ट्रभर सकल धनगर समाजाच्यावतीने आंदोलन करण्यात येईल
याची जबाबदारी सर्वस्वी शासन व प्रशासनाची राहिले.
असे सकल धनगर समाज जिल्हाध्यक्ष अनिल गोयकर हे पत्रकारांशी बोलताना म्हणाले

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने