• Story 1
  • Story 2
  • Story 3
  • Story 4
  • Story 5

मोठी बातमी! महाराष्ट्रातल्या या बड्या बँकेत कोट्यवधी रुपयांचा घोटाळा, ठेविदारांमध्ये चिंता, तुमचंही अकाउंट आहे का?


मोठी बातमी समोर येत आहे, राज्यात यापूर्वी देखील काही बँकेत घोटळा झाल्याची प्रकरणं समोर आली होती, त्यांच्यावर आरबीआयने कारवाई देखील केली आहे. दरम्यान आता आणखी एका बड्या बँकेत मोठा घटाळा झाला आहे.

मोठी बातमी! महाराष्ट्रातल्या या बड्या बँकेत कोट्यवधी रुपयांचा घोटाळा, ठेविदारांमध्ये चिंता, तुमचंही अकाउंट आहे का?राज्यात यापूर्वे देखील काही बँकांमध्ये घोटाळा झाल्याची प्रकरणं घडली आहे. या बँकांवर आरबीआयकडून कारवाई देखील करण्यात आली. बँकेत घोटाळा झाल्यास ठेवीदारांची चिंता वाढते, काही प्रकरणात तर आरबीआयने कारवाई केल्यामुळे अनेक ठेवीदारांना आपल्याच हक्काचे पैसे मिळण्यासाठी देखील अनेक महिने वाट पहावी लागते. यामुळे ठेवीदारांची मोठी गौरसोय होते. गेल्या दोन ते तीन वर्षांमध्ये काही बँका आणि पतसंस्थांमध्ये मोठे घोटाळे झाल्याच्या घटना घडल्या आहेत.  दरम्यान त्यानंतर आता आशीच एक घटना समोर आली आहे. ही घटना समोर येताच ठेवीदारांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. जालन्याच्या बदनापूर शहरातील कॅनरा बँकेत 7.31 कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
सोन्याच्या दागिन्यांची चोरी आणि बनावट सोने ठेवून 7 कोटी 31 लाख रुपयांची बँकेची फसवणूक करण्यात आली आहे. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणात बदनापूर पोलीस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापैकी बँक मॅनेजर आणि सुवर्णकाराला ताब्यात घेण्यात आलं आहे, तर आणखी एक जण फरार असून त्याचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने