लातूर दि. ११ मार्च (प्रतिनिधी) ब्रह्माकुमारीस द्वारा राजयोग भवन येथे सक्षम - २०२६ जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आले यावेळी जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर मुख्य अतिथी उपस्थित होत्या. इंधनाची बचत ही केवळ गरज नसून ती एक देशसेवा आहे. ऊर्जा सुरक्षा आणि पर्यावरण रक्षण ही आता एक लोकचळवळ झाली पाहिजे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर यांनी केले. ऊर्जा बचत करणे हे केवळ सरकारचे काम नाही तर प्रत्येक नागरिकाचे वैयक्तिक कर्तव्य आहे. केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयाद्वारे प्रेरित "सक्षम" हे जनजागृती मोहिमांचे मुख्य घोषवाक्य आहे, जे हा संदेश देते की चालणे, सायकल वापरणे आणि ट्रॅफिक सिग्नलवर इंजिन बंद करणे यासारखे छोटे वैयक्तिक प्रयत्न पर्यावरण वाचवण्यात आणि इंधनाचा वापर कमी करण्यात मोठी भूमिका बजावतात. ऊर्जा संवर्धन जनजागृती 'ऊर्जा दूत' अभियानाचे उद्घाटन जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर यांच्याद्वारे करण्यात आले. ब्रह्मा कुमारी नंदा दीदी म्हणाल्या की, आपण सर्वांनी मिळून अध्यात्माच्या माध्यमातून प्रत्येकाने एक युनिट ऊर्जेची बचत केली तर राष्ट्राची दोन युनिटची बचत होणार असल्याचे सांगितले. ऊर्जा ऑडिटर केदार खमितकर म्हणाले की, वाढते प्रदूषण ही जागतिक समस्या असून त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी नैसर्गिक आणि हरित इंधनाचा वापर वाढवणे आवश्यक आहे. कच्च्या तेलाच्या आयातीवरील अवलंबित्व कमी करून देशाचे परकीय चलन वाचवण्यासाठी प्रत्येक नागरिकाने इंधन बचतीचे कर्तव्य पार पाडावे. ऊर्जा, पर्यावरण आणि शाश्वत विकास या विषयाचे डॉकमेंटरी फिल्म दाखवण्यात आले."ईंधन संरक्षण की जिम्मेदारी, जनगण की भागीदारी' असा संदेश या वेळी देण्यात आला. पारंपरिक इंधन संरक्षण भित्तीपत्रके मान्यवरांच्या हस्ते परिसरात अनावरण करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ब्रह्मा कुमारी पुण्या दीदी यांनी केले. प्रारंभी सर्व मान्यवरांची पुष्प गुच्छ देऊन व आत्म स्मृती तिलक लावून ब्र.कु. प्रीती, ब्र.कु. जगदेवी यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले. आयोजित इंधन बचत डोमेस्टिक वर्कशॉप मधे शहरातील अनेक मान्यवर महिला सहभागी झाले. कार्यक्रमाचा समारोप सक्षम प्रतिज्ञेने करण्यात आला.
Tags
द महाराष्ट्र न्यूज