सर्व ताकदीनिशी जि प व पं स निवडणूका लढविण्यासाठी एकमुखी बैठकीत निर्णय..
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या सामान्य जनतेच्या मुलभूत , तिकडच्या प्रश्नावर आधारित असतात.. त्याची सोडवणूक होणे नितांत गरजेचे असते..सदर सामान्यांच्या प्रश्नांची जाण असणारे पक्ष नेतृत्व हे शिवसेनेकडेच असुन मा ना एकनाथराव शिंदे साहेब यांचे विकास कार्य,धोरण हे सर्व पदाधिकारी व शिवसैनिकांनी गावोगावी, घरा घरात पोहचवून पक्षाची ताकत वाढविण्यासाठी प्रयत्न करावे असे आवाहन शिवसेना जिल्हाप्रमुख मा शिवाजीराव माने साहेब यांनी शि अनंतपाळ येथे आयोजित जि प व पं स निवडणूकीसाठी नियोजन बैठकीत बोलतांना केले.
आज दिनांक 10 डिसेंबर 2025 रोजी शिरूर अनंतपाळ येथे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सन्माननीय शिवाजीराव माने साहेब यांच्या अध्यक्षतेखाली तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी जिल्हा परिषद पंचायत समितीचे संभाव्य उमेदवार अंगीकृत सेनेचे सर्व पदाधिकारी यांची बैठक झाली.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख शिवाजीराव माने साहेब म्हणाले की शिवसेनेचे मुख्य नेते या राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणीचे लाडके भाऊ एकनाथराव शिंदे साहेब हेच आपलं भांडवल असून मुख्यमंत्री पदाच्या अडीच वर्षाच्या कालखंडामध्ये जे काही निर्णय घेतले ते सर्व निर्णय सर्वसामान्य माणसाच्या अत्यंत जिव्हाळ्याचे निर्णय घेतलेले असून त्या निर्णयामुळे आज एकनाथ शिंदे साहेबांच्या नावावर संपूर्ण महाराष्ट्रात निवडणुका लढवल्या जातात फक्त निवडणूक लढवल्या जातात एवढ्यावरच नाही तर उमेदवाराचा विजय सुद्धा निश्चित फक्त आणि फक्त एकनाथ शिंदे साहेबां कामाकडे बघून लोक करणार आहेत आपण सर्वांनी सर्व पदाधिकाऱ्यांनी उमेदवारांनी मतदार समोर नम्रतेपूर्वक जाऊन मी एकनाथ शिंदे यांच्या कार्यकर्ता असून शिंदे साहेबांच्या नेतृत्वामध्ये समाजसेवेचे व्रत स्वीकारलेलं आहे ही निवडणूक मी आपली सेवा करण्यासाठी लढवत आहे असे आव्हान आपण सर्वसामान्य पर्यंत पोहोचून घरोघर पोहोचून करावे मला नक्की खात्री आहे शिरूर अनंतपाळ तालुक्यातील दोन्ही जिल्हा परिषद चारही पंचायत समिती धनुष्यबाणाच्या चिन्हावर एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली या भागातील जनता निवडून दिल्याशिवाय राहणार नाही कार्याचा आलेखच एवढा उंच आहे की तो विरोधकांना पुसता येणार नाही आणि म्हणून आपण सर्वांनी या निवडणुकीला सामोरे जात असताना अतिशय नम्रपणे एकनाथ शिंदे साहेब हेच आमचे भांडवल आहे हे गृहीत धरून आपण कामाला लागावे शिवसेनेचे मुख्य नेते सन्माननीय एकनाथराव शिंदे साहेब यांनी महायुती मधून निवडणुका लढवायच्या आहेत असा आदेश दिलेला आहे परंतु कुठला मतदारसंघ कोणाला सुटणार आहे कोणत्या मतदारसंघ कोणत्या पक्षाला सुटणार आहे हे माहित नाही त्यामुळे शिरोळ आंबा तालुक्यामध्ये शिवसेनेचे असणारी ताकद एकनाथ शिंदे साहेबांबद्दल असणारा आदर हे पाहून आम्ही दोन्ही जिल्हा परिषद चारी पंचायत समिती निवडणुकीसाठी सज्ज आहोत शेवटी शिवसेना मुख्य नेते सन्माननीय एकनाथराव शिंदे साहेब यांच्या आदेशाप्रमाणे महायुतीच्या बाबतीत आदेश पाळला जाईल आणि त्याप्रमाणे निवडणुकीला सामोरे जावे लागेल अशी ही सूचना शिवसेना जिल्हाप्रमुख शिवाजीराव माने साहेब यांनी केली या बैठकीचे प्रास्ताविक निलंगा विधानसभेचे विधानसभा प्रमुख ज्येष्ठ पत्रकार सोमनाथ स्वामी डिगोळकर यांनी केले प्रमुख उपस्थितीमध्ये तालुकाप्रमुख विकास शिंदे, महिला आघाडी तालुकाप्रमुख सौ वर्षाताई शिंदे, मागासवर्गीय महिला आघाडी जिल्हाप्रमुख ,सरोजाताई गायकवाड ग्रंथपाल सेनेचे जिल्हाप्रमुख गोविंदराव श्रीमंगल ,विधानसभा संघटक, मुरलीधर शिंदे शहरप्रमुख विनोद धुमाळे, युवा सेना ता प्रमुख धनराज माने, उप तालुकाप्रमुख मन्मथ सुगावे आदी सह शेकडो शिवसैनिक यावेळी उपस्थित होते..
Tags
द महाराष्ट्र न्यूज