• Story 1
  • Story 2
  • Story 3
  • Story 4
  • Story 5

विश्वधर्मी प्रा. डॉ विश्वनाथजी कराड यांच्या जन्मदिनानिमित्त यशवंतराव चव्हाण ग्रामीण रुग्णालयात वीस दिवसीय आरोग्य सुरक्षा महाशिबीरसर्व प्रकारच्या रुग्णांनी लाभ घ्यावा -कार्यकारी संचालक आ. रमेशआप्पा कराड


 लातूर दि. १५ - माईर्स एमआयटीचे संस्थापक अध्यक्ष विश्वधर्मी प्रा. डॉ. विश्वनाथजी कराड यांच्या जन्मदिनानिमित्ताने लातूर एमआयटी वैद्यकीय महाविद्यालय आणि यशवंतराव चव्हाण ग्रामीण रुग्णालयाच्या वतीने १५ जानेवारी ते ५ फेब्रुवारी दरम्यान वीस दिवस आरोग्य सुरक्षा महाशिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराचा सर्व प्रकारच्या रुग्णांनी मोठ्या प्रमाणात लाभ घ्यावा असे आवाहन एमआयटीचे कार्यकारी संचालक आ. रमेशआप्पा कराड यांनी केले आहे.
           तळागाळातील गोरगरीब लाखो विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षणाचा ध्यास घेतलेले एमआयटी शिक्षण समूह पुणे आणि विश्वशांती केंद्र आळंदी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथजी कराड यांचा येत्या ३ फेब्रुवारी रोजी जन्मदिवस असून यानिमित्ताने लातूर येथील एमआयटी वैद्यकीय महाविद्यालय आणि यशवंतराव चव्हाण ग्रामीण रुग्णालयाच्या वतीने सलग वीस दिवस सर्व प्रकारच्या रुग्णांसाठी मोफत वैद्यकीय तपासणी व उपचाराकरिता आरोग्य सुरक्षा महाशिबिराचेआयोजन करण्यात आले आहे. असे सांगून आ. रमेशआप्पा कराड म्हणाले की, विविध प्रकारच्या रुग्णसेवेसाठी एमआयटीच्या ग्रामीण रुग्णालयासह लातूर शहरातील विविध भागासह लातूर ग्रामीण विधानसभा मतदार संघाच्या कार्यक्षेत्र विविध ठिकाणी सर्व रोग निदान शिबिराचे नियोजन करण्यात येत आहे.
        गेल्या ३४ वर्षापासून एमआयटी वैद्यकीय महाविद्यालय आणि यशवंतराव चव्हाण ग्रामीण रुग्णालयाच्या वतीने विविध प्रकारच्या रुग्णांना अविरत सेवा देण्यात येत आहे. या रुग्णालयात सर्व प्रकारच्या अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. ७५० खाटा उपलब्ध असून रुग्णालयात सर्व प्रकारच्या सुपर स्पेशलिटी सेवा सह १२ ऑपरेशन थिएटर अद्यावत प्रयोगशाळा २४ तास रक्तपेढी व अपघात विभाग कार्यरत आहे.
           आरोग्य सुरक्षा महाशिबिर अंतर्गत रुग्णालयाच्या वतीने सर्वसामान्य शास्त्रक्रिया, हाडांच्या शस्त्रक्रिया, महात्मा फुले योजनेअंतर्गत सर्व तपासण्या, कुटुंबकल्याण शस्त्रक्रिया, कान नाक घसा वरील सामान्य शस्त्रक्रिया व उपचार, छातीचे आणि त्वचेचे आजार व उपचार प्रस्तुती सेवा व सिझेरियन शस्त्रक्रिया औषधासह यासह विविध आजारावर पूर्णपणे मोफत उपचार केले जाणार असून आयसीयू, एनआयसीयु उपचार व तपासणी सिटीस्कॅन, एमआरआय, मेंदूरोग, यकृत, जठर रोग, कॅन्सर व मुतखड्यावरील तपासणी उपचार शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे विविध प्रकारच्या शस्त्रक्रिया व्यंध्यत्व निवारण तपासणी उपचार, प्लास्टिक सर्जरी हृदयरोग व मधुमेह उपचार अधिक सुविधा माफक दरात दिल्या जाणार आहेत. तेव्हा सर्व प्रकारच्या रुग्णांनी आरोग्य सुरक्षा महाशिबीराचा मोठ्या प्रमाणात लाभ घ्यावा असे आवाहन एमआयटीचे कार्यकारी संचालक आ. रमेशआप्पा कराड, एमआयटी मेडिकल कॉलेजचे अधिष्ठता डॉ. एन. पी. जमादार यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने