• Story 1
  • Story 2
  • Story 3
  • Story 4
  • Story 5

डॉ नाकाडे यांचे शैक्षणिक सामाजिक आणि मराठवाड्याच्या विकासातील योगदान बहुमूल्य:- खासदार डॉ शिवाजी काळगे

लातूर ( प्रतिनिधी): डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू, तसेच लातूर येथील दयानंद विधी महाविद्यालयाचे माजी प्राचार्य, डॉ. शिवराज नाकाडे यांच्या अकस्मित निधनाचे वृत्त दुःखद असल्याचे खासदार डॉ शिवाजी काळगे यांनी म्हटले आहे, शैक्षणिक सामाजिक आणि मराठवाड्याच्या विकासातील त्यांचे उल्लेखनीय योगदान कायम माझ्या स्मरणात राहील असेही त्यांनी म्हटले आहे. 

खासदार डॉ शिवाजी काळगे यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे की, आदरणीय डॉ शिवराज नाकाडे यांनी शिक्षण संस्थाचालक, कुलगुरू, प्राचार्य, म्हणून  शिक्षण क्षेत्रात बहुमोल योगदान दिले, मराठवाडा वैज्ञानिक विकास मंडळाचे सदस्य म्हणूनही  त्यांनी मराठवाड्याच्या विकासाला चालना दिली, आदरणीय बंडप्पा काळगे यांच्याशी त्यांचे अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध होते बंडप्पा महालिंगप्पा काळगे यांनी ही डॉ नाकाडे यांना भावपूर्ण सर्द्धांजली अर्पण केली डॉ. नाकाडे कुटुंबीयांच्या या दुःखात मी व काळगे कुटुंबीय सहभागी आहोत. त्यांना हे दुःख सहन करण्याची शक्ती मिळो ही ईश्वरचरणी प्रार्थना, त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो असे शेवटी खासदार डॉ शिवाजी काळगे यांनी म्हटले आहे.
----------------------------------------

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने