• Story 1
  • Story 2
  • Story 3
  • Story 4
  • Story 5

एमआयटी पुणे व दयानंद कॉलेजच्या वतीने आयोजित करियर कनेक्टमधून उच्च शिक्षणाच्या संधीलातूरात विद्यार्थ्यांना मौलिक मार्गदर्शन


        लातूर दि.१४ - एमआयटी विश्वशांती विद्यापीठ पुणे व दयानंद कॉलेज लातूर यांच्यात झालेल्या शैक्षणिक सामंजस्य करारानुसार करिअर कनेक्ट व बारावीनंतर उच्च शिक्षणाच्या संधी या विषयावर १४ डिसेंबर २०२४ रोजी विद्यार्थ्यांना मौलिक मार्गदर्शन करण्यात आले. लातूर येथील दयानंद सभागृहात आयोजित या कार्यक्रमास दयानंद कॉलेज सह लातूर शहरातील आणि परिसरातील असंख्य विद्यार्थ्यांनी याचा लाभ घेतला.
         करियर कनेक्ट या कार्यक्रमासाठी दयानंद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सिद्धेश्वर बेल्हाळे, उपप्राचार्य प्रा. भाऊसाहेब सरवदे, एमआयटी विश्वशांती विद्यापीठातर्फे प्रा. डॉ. सुनील कराड, डॉ. दिनेश भुतडा आणि डॉ. नाथराव जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती. दरवर्षी होणाऱ्या सदरील कार्यक्रमातून बहुसंख्य विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात लाभ होत असल्याने आज झालेल्या कार्यक्रमास विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी मोठी गर्दी केली होती. 
              करियर कनेक्ट कार्यक्रमात बोलताना एमआयटीचे डॉ. सुनील कराड म्हणाले की, आजच्या विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाची जोड आवश्यक आहे, महाराष्ट्रामध्ये इंजीनियरिंग आणि मेडिकल कॉलेज यामध्ये जी स्पर्धा आहे त्या स्पर्धेत लातूरचे विद्यार्थी उत्कृष्टपणे सहभागी होऊन संपूर्ण देशात लातूरचे नाव केले आहे आणि करत आहेत, सध्या आजचा नवयुवक म्हणजेच उद्याचा भारत देश आणि या देशासाठी जी तांत्रिक क्रांती आहे ते म्हणजेच नवयुवक असे सांगून अभियांत्रिकी व वैद्यकीय विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
            डॉ. दिनेश भुतडा यांनी वैद्यकीय आणि अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रिया व राज्यातील व देशातील म्हणजेच आयआयटी, सीईटी, एमआयटी-डब्ल्यूपीयु प्रवेश प्रक्रिया व त्यासाठी तयारी कशी करावी याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून अभियांत्रिकी मधील नवीन करिअरच्या संधी तसेच शाखा निवड याविषयी त्यांनी माहिती दिली. तर डॉ. नाथराव जाधव यांनी एमआयटी डब्ल्यूपीयु मधील विविध स्कॉलरशिपची माहिती सांगितली. दयानंद कॉलेजचे प्राचार्य डॉ. सिद्धेश्वर बेल्हाळ यांनी उपस्थितांचे स्वागत करून मौलिक मार्गदर्शन केले, कार्यक्रमाच्या शेवटी डॉ. संध्या वाडेकर यांनी आभार प्रदर्शन केले.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने