• Story 1
  • Story 2
  • Story 3
  • Story 4
  • Story 5

प्रा.दत्ता करंडे यांना पीएच. डी. पदवी प्रदान.

दि 23/12/2024 महात्मा बसवेश्वर महाविद्यालयातील समाजकार्य विभागातील प्रा. दत्ता करंडे यांना दि. 20 डिसेंबर 2024 रोजी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड अंतर्गत सामाजिक शास्त्रे संकुल येथील संशोधन केंद्रामध्ये पीएच. डी. पदवी प्रदान करण्यात आली यावेळी समितीचे अध्यक्ष आंतरविद्या शाखाचे अधिष्ठाता डॉ. सी. आर. बाविस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक शास्त्रे संकुल केंद्राचे संचालक डॉ. घन:श्याम येळने, बहिस्थ परीक्षक डॉ. उमेश गडेकर (कोल्हापूर) आणि संशोधक मार्गदर्शक तथा प्रभारी प्राचार्य डॉ. संजय गवई यांच्या उपस्थितीमध्ये प्रदान करण्यात आली.  
त्यांनी “वंचित विधवा स्त्रियांच्या सामाजिक व आर्थिक समस्यांचा चिकित्सक अभ्यास” या विषयावर अत्यंत अभ्यासपूर्ण आणि चिकित्सक पद्धतीने संशोधन केले आहे. 
विशेष आनंद म्हणजे प्रा. दत्ता करंडे हे माझे पहिले संशोधक विद्यार्थी आहेत.
यावेळी डॉ. अभयकुमार धाराशिवे, प्रा. आशिष स्वामी, फुलचंद कावळे, डॉ. नितीन गायकवाड, संगमेश्वर मुळे आणि संशोधन विद्यार्थी यांचीही उपस्थिती होती.
यावेळी डॉ. दत्ता करंडे यांचे सर्वांनी अभिनंदन करून पुढील कार्यासाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने