लातुरात दोन दिवसीय मुख्याध्यापकांच्या ६१ व्या
राज्यस्तरीय शैक्षणिक संमेलनाचे आयोजन : प्रकाश देशमुख
लातूर : अखिल महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संयुक्त महामंडळ पुणेच्या वतीने येत्या
दि. २८ व २९ डिसेंबर २०२४ रोजी लातूर येथील औसा रोडवरील थोरमोटे लॉन्स याठिकाणी मुख्याध्यापकांच्या ६१
व्या राज्यस्तरीय शैक्षणिक संमेलनाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती लातूर जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक
मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष तथा राज्याचे उपाध्यक्ष प्रकाश देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिली.
थोरमोटे लॉन्स, औसा रोड लातूर येथे लोकनेते विलासराव देशमुख नगरीत पार पडणाऱ्या या दोन दिवसीय शैक्षणिक
संमेलनाचे उद्घाटन शनिवार, दि. २८ डिसेंबर रोजी सकाळी अकरा वाजता सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते
होणार आहे. संमेलनाच्या स्वागताध्यक्ष पदाची जबाबदारी माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्यावर सोपविण्यात आली आहे.
संमेलनाध्यक्ष म्हणून प्राचार्य बाबुराव जाधव तर संमेलन कार्याध्यक्ष म्हणून हनुमंत साखरे यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात
आली आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून खा. डॉ. शिवाजी काळगे, खा. ओमराजे निंबाळकर, आ. अमित देशमुख,
आ. संभाजी पाटील निलंगेकर, आ. संजय बनसोडे, आ. विक्रम काळे, आ.अभिमन्यू पवार, आ. सतीश चव्हाण, आ.
रमेशप्पा कराड, माजी आमदार धीरज देशमुख, लातूर विभागीय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष सुधाकर तेलंग, विभागीय शिक्षण
उपसंचालक गणपतराव मोरे, मुख्याध्यापक संयुक्त महामंडळाचे संस्थापक अध्यक्ष रावसाहेब आवारी आदी मान्यवरांची
प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
मुख्य
शनिवारी दुपारच्या सत्रात दुपारी ३ वाजता नवीन शैक्षणिक धोरण या विषयावर माजी शिक्षण संचालक गोविंद नांदेडे,
आरसीसीचे प्रा. शिवराज मोटेगावकर यांचे व्याख्यान होणार आहे. तर सायंकाळी चार वाजता मुख्याध्यापक : कर्तव्य व
जबाबदाऱ्या या विषयावर व्याख्यान होणार आहे. यावेळी जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे, जिल्हा परिषदेचे कार्यकारी
अधिकारी अनमोल सागर, अकॅडमिक स्किल कोच श्रीमती वैशालीताई देशमुख, वसंतराव पाटील, मोहन सोनवणे यांची
प्रमुख उपस्थिती राहणार आहे. सायंकाळी ५ वाजता अशैक्षणिक कामे आणि शैक्षणिक गुणवत्ता या विषयावरील शोधनिबंध
मराठवाडा माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघ हिंगोली हे सादर करणार आहेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी
संजय शिप्परकर हे राहणार आहेत. रात्री सात ते साडेआठ या वेळेत सांस्कृतिक कार्यक्रम होतील.
रविवार, दि. २९ डिसेंबर रोजी सकाळच्या पहिल्या सत्रात आरटीई ऍक्ट २००९ अंमलबजावणी बाबत विदर्भ
मुख्याध्यापक संघ शोध निबंध सादर करतील. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मारुती खेडेकर हे राहणार आहेत. यावेळी
सतीश जगताप, शत्रुघ्न बिडकर यांची प्रमुख उपस्थिती राहील. सकाळी साडेदहा ते साडेअकरा या वेळेत होणाऱ्या व्याख्यान
प्रसंगी शिक्षण संचालक तथा शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी, शिक्षण संचालक संपत सूर्यवंशी, महेश पालकर,
राहुल रेखावार, रावसाहेब आवारी आदी मान्यवरांची उपस्थित राहणार आहे. सकाळी साडेअकरा वाजता लातूर पॅटर्न :
एक दृष्टीक्षेप या विषयावर प्रा. सतीश पवार यांचे व्याख्यान होईल. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी के. एफ. ढोमसे हे राहणार
आहेत. यावेळी खंडेराव जगदाळे, दत्तात्रय कदम, एस.बी. जगताप यांची उपस्थिती राहणार आहे. दुपारी बारा वाजता
जीवन सुंदर आहे या विषयावर सिनेअभिनेत्री निशिगंधा वाड यांचे व्याख्यान होणार आहे. दुपारच्या सत्रात खा. डॉ. शिवाजी
काळगे, आ. विक्रम काळे यांचा सत्कार केला जाणार असून त्यानंतर खुले अधिवेशन होणार असल्याचे प्रकाश देशमुख
यांनी सांगितले.
या राज्यस्तरीय संमेलनाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक संयुक्त महामंडळाचे संयुक्त अध्यक्ष रावसाहेब आवारी,
अध्यक्ष के. एस. ढोमसे, कार्याध्यक्ष मोहन सोनवणे, राज्य उपाध्यक्ष नंदकुमार बारवकर, शत्रुघ्न बिरकड, अशोक मोरे,
मराठवाडा अध्यक्ष संजय शिप्परकर, उपाध्यक्ष देविदास उमाटे, कांचन महाजन, नामदेव सोनवणे, सचिव जालिंदर पैठणे,
विदर्भ अध्यक्ष सतीश जगताप, उपाध्यक्ष मंदा उमाटे, विनोद संगीतराव, सचिव विलास भारसाकळे, लातूर जिल्हा अध्यक्ष
प्रकाश देशमुख, सचिव बजरंग चोले, कोषाध्यक्ष शिवराज म्हेत्रे प्रवक्ते कालिदास शेळके, उपाध्यक्ष रमेश मदरसे, सचिन
साबणे, उमेश पाटील, श्रीमती जयश्री ढवळे, मार्गदर्शक दिलीप धुमाळ, धनराज चिद्रे, सुवर्णा जाधव, दत्तात्रय पारवे
, अनिल कारभारी, रामेश्वर कदम, बालाजी मुंडे, एस.व्ही. मादलापूरे, परवेजखान पठाण, विशाल पात्रे, जयश्री पाटील
आदी परिश्रम घेत आहेत.
Tags
The महाराष्ट्र News