महामहिम राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांच्याहस्ते संस्थापक अध्यक्ष माजी आ.कव्हेकर व उपाध्यक्ष अजितसिंह पाटील कव्हेकर यांना नवभारत सीएसआर अवार्ड-2025 ने सन्मानीत
जेएसपीएमचा मुंबईत गौरव ः संस्थेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा
शिक्षणामध्ये लातूर पॅटर्न देशभरात गाजलेला आहे. या लातूर पॅटर्नमध्ये योगदान देणार्या व शिक्षणाला सामाजिक व मानवी चेहरा देणार्या लातूरच्या जयक्रांती शिक्षण प्रसारक मंडळ (जेएसपीएम) संस्थेला नवभारत सीएसआर अवार्ड देऊन सन्मानीत करण्यात आले. यामध्ये जेएसपीएमचे संस्थापक अध्यक्ष माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर, जेएपीएमचे उपाध्यक्ष अजितसिंह पाटील कव्हेकर व जेएसपीएमचे कार्यकारी संचालक रंजितसिंह पाटील कव्हेकर यांना महाराष्ट्राचे महामहिम राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांच्याहस्ते मुंबईतील परेल येथील आयसीटी ग्रँड सेंटर येथे घेण्यात आलेल्या कार्यक्रमात राज्यातील नामांकित नवभारत सीएसआर अवार्ड -2025 देऊन सन्मानीत करण्यात आले.
या गौरव सोहळ्याला बजाज फाऊंडेशनचे चेअरमन शिशिर बजाज, मेघाश्रय या संस्थेच्या संस्थापक विश्वस्त श्रीमती सिमा सिंग, नवभारत ग्रुपचे प्रबंध संपादक निमिष माहेश्वरी, वैभव माहेश्वरी, नवभारतचे श्रीनिवास सर, सीएसआरचे पॅनालिस्ट लॉर्ड मिसेसे मेबन, अब्राहम रविन ग्रुपचे सीएमडी विजय कार्या, रूबी हॉल क्लिनीकचे मुख्य कार्यकारी अधिकारी बेहराम खोदाई, जेएसडब्ल्यू फाऊंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी हर्षवर्धन नवाते, राजाशिव छत्रपती प्रतिष्ठान विश्वस्त जगदीश कदम, युनियन दाई इची लाईफ इन्शुरंश कंपनीचे संचालक राकेश कुमार, आरएसबी फाऊंडेशनच्या सल्लागार डॉ.मिसेस लोना नायक आदी मान्यवर उपस्थित होते.
गुणवत्तापूर्ण शिक्षणाची कास धरून शिक्षणातून मानवचेतना आणि समाजवर्तनाचा विकास करणे हे ध्येय ठेवून स्थापन करण्यात आलेल्या जेएसपीएम शिक्षण संस्थेचा उद्देश कौशल्यावर आधारित शिक्षणातून कौशल्ययुक्त मनुष्यबळ निर्माण करणे, शिक्षणातील बदलते प्रवाह आणि मुलभूत गरजांची सांगड घालणे, मुल्यशिक्षण आणि व्यावसायिकता याचा सुयोग्य मेळ घालण्याचे काम जेएसपीएम शिक्षण संस्थेच्या माध्यमातून गेल्या चाळीस वर्षापासून सुरू आहे. या संस्थेच्या माध्यमातून 11530 नागरिकांची नेत्र तपासणी करून 2800 नागरिकांवर शस्त्रक्रिया करून त्यांना नवी दृष्टि देण्याचे काम केले. आत्महत्याग्रस्त दीडशे परिवारांना प्रत्येकी दहा ते पंधरा हजाराची मदत करून त्यांच्या कुटुंबातील मुलांना शिक्षणासाठी दत्तक घेण्याचे काम केले. सेवालायातील अनाथ मुलांनाही सर्वतोपरी मदत करण्याचे काम केले याबरोबरच विद्यार्थ्यांना अत्याधुनिक तंत्रज्ञान मिळावे यासाठी मराठवाड्यातील पहिला एआय कोर्स जेएसपीएम संस्थेमार्फत सुरू करण्याचे काम केले. जेएसपीएम व युनिसेड संस्थेच्यावतीने लातूर, रेणापूर तालुक्यातील 21 हजार शालेय विद्यार्थ्यांना मोफत बॅगचे वाटप करण्यात आले. आर्षयोग प्रतिष्ठान आणि जेएसपीएम संस्थेच्या माध्यमातून गेल्या 35 वर्षापासून योग, प्राणायाम शिबीर घेण्याचे काम केले जाते. तसेच रेणापूर येथील शिवाजी महाविद्यालयाच्या माध्यमातून आंतर महाविद्यालयीन वाद-विवाद स्पर्धा गेल्या 25 वर्षापासून सुरू असून यातून अनेक वक्ते घडविण्याचे काम संस्थेचे केलेले आहे.
वृक्ष लागवडीचा उपक्रम राज्यासाठी ठरला दिशादर्शक..
एक वृक्ष एक विद्यार्थी हा उपक्रम राबवून विद्यार्थ्यांना वृक्ष लागडवीसह संगोनणासाठी प्रेरीत करण्याचे काम केले. या वृक्षारोपणाला गुणपत्रिकेत गुण दिल्यामुळे हा प्रकल्प राज्यासाठी पथदर्शी ठरला आहे. यशस्वी विभागीय मंडळाला हजारो रूपयाची ग्रंथ संपदा देऊन वाचन संस्कृतीला बळ देण्याचे काम केलेले आहे. तसेच एज्युकेशन 2020 परिषदेचे आयोजन करून राष्ट्रीय पातळीवरील शिक्षणतज्ज्ञ डॉ.भालचंद्र मुनगेकर यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी करण्याचे काम केले. याचबरोबरच आर्ट ऑफ लिव्हींगचे आनंद अनुभूती शिबीर, कै.बळवंतराव पाटील शिष्यवृत्ती योजना, आध्यात्मिक शिक्षण व जेएसपीएम आणि आर्यसमाज लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने ओमप्रकाश शास्त्री यांच्या मार्फत मुल्य शिक्षण देण्याचे काम गेल्या अनेक वर्षापासून सुरू आहे. संस्थेच्या अंतर्गत येणार्या स्वामी विवेकानंद विद्यालयाला मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रमासाठी दोन लाखाचे पारितोषीक देण्यात आले तर बिटरगाव येथील शिवाजी विद्यालयाला लाखाचे बक्षीस मिळाले, असे अनेक उपक्रम राबवून जेएसपीएम संस्थेचे शिक्षणाबरोबर सामाजिक उत्तरदायित्व जपण्याचे काम केलेले आहे. त्यामुळे शिक्षण, सेवा व सामाजिक कार्याची दखल घेऊन जेएसपीएमचे सर्वेसर्वा कव्हेकर पिता-पुत्रांना सीएसआर अवार्ड -2025 देऊन महामहिम राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांच्याहस्ते सन्मानीत करण्यात आलेले आहे. त्यामुळे संस्थेच्या या दैदिप्यमान यशाबद्दल जेएसपीएम संस्थेचे सर्वत्र कौतुक होत आहे.
Tags
The महाराष्ट्र News