• Story 1
  • Story 2
  • Story 3
  • Story 4
  • Story 5

श्री वेताळेश्वर शिक्षण संस्थेचे युवा रंग २०२५ वार्षिक स्नेहसंमेलनाचे उद्घाटन संपन्न.

श्री वेताळेश्वर शिक्षण संस्थेचे युवा रंग २०२५ वार्षिक स्नेहसंमेलनाचे उद्घाटन संपन्न

श्री वेताळेश्वर शिक्षण संस्था संचलित लातूर कॉलेज ऑफ फार्मसी हासेगाव, लातूर कॉलेज ऑफ फार्मसी लातूर,लातूर कॉलेज ऑफ फिजिओथेरपी ,लातूर कॉलेज ऑफ नर्सिंग, राजीव गांधी इन्स्टिट्यूट ऑफ पॉलीटेक्निक, लातूर कॉलेज ऑफ आयटीआय यांच्या संयुक्त विद्यमानाने युवा रंग २०२५ वार्षिक स्नेहसंमेलनाचे  
उद्घाटन सौदागर तांदळे तहसीलदार लातूर यांच्या शुभहस्ते  करण्यात आले .सोबत सुधीर पोद्दार ओबीसी जिल्हा अध्यक्ष भाजपा ,मुकेश बीदादा व्यापारी लातूर यांच्या शुभहस्ते सरस्वती मातेच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. "स्पर्धा परीक्षा देऊन प्रशासनामध्ये नोकरी करा कारण समाजातील सर्व घटकाची सेवा करण्याची संधी मिळते" असे प्रतिपादन सौदागर तांदळे यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक वेताळेश्वर बावगे यांनी केले.
 सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये नृत्य, गायन ,ग्रुप नृत्य, नाटक इत्यादी  विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्याचे संधी श्री वेताळेश्वर शिक्षण संस्था देते. एका पेक्षा एक सरस असे सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण विद्यार्थ्यांनी केले. या कार्यक्रमाला उपस्थित संस्थेचे अध्यक्ष भीमाशंकर बावगे, उपाध्यक्ष सौ जयदेवी बावगे,सचिव वेताळेश्वर बावगे संचालिका सौ माधुरी बावगे,  सौ योगिता बावगे, प्राचार्य नंदकिशोर बावगे ,डॉ.श्रीनिवास बुमरेला,डॉ.नितीन लोणीकर, संतोष मेदगे , डॉ वीरेंद्र मेश्राम, माधव सोनहिवरे,कालिदास गोरे तसेच संस्थेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन खवले सर व आभार एम एस कादर यांनी मानले.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने