• Story 1
  • Story 2
  • Story 3
  • Story 4
  • Story 5

शिवसेनेचे मुख्य नेते महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा सध्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय एकनाथराव शिंदे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून लातूर जिल्ह्यामध्ये शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शिवाजीराव माने यांच्या मार्गदर्शनाखाली निलंगा व शिरूर अनंतपाळ या तालुक्यातील महिला आघाडीच्या शाखा स्थापन

शिवसेनेचे मुख्य नेते महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा सध्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय एकनाथराव शिंदे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून लातूर जिल्ह्यामध्ये शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शिवाजीराव माने यांच्या मार्गदर्शनाखाली निलंगा व शिरूर अनंतपाळ या तालुक्यातील महिला आघाडीच्या शाखा स्थापन* 
आज दिनांक 8 फेब्रुवारी 2025 रोजी लातूर जिल्ह्यातील निलंगा व शिरोळ तालुक्यातील महिला आघाडीच्या शिवसेनेच्या शाखा स्थापन करण्यात आल्या .सदरील शाखा महिला आघाडी लातूर जिल्हा संपर्कप्रमुख सौ रंजनाताई कुलकर्णी यांच्या हस्ते आज दिनांक आठ फेब्रुवारी 2025 रोजी निलंगा व शिरूर अनंतपाळ या दोन्ही तालुक्यातील निटूर व निटुर मोड, उंबरदरा, गणेश वाडी भुईवार वाडी, ढोबळेवाडी अशा सहा महिला आघाडीच्या शाखाचे उद्घाटन झालेले असून
सन्माननीय एकनाथराव शिंदे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शिवाजीराव माने साहेब यांनी एकूण 61 शाखा फक्त महिला आघाडीच्या स्थापन करण्याचे नियोजन झालेलं आहे.
तसेच राज्यात लाडके भाऊ सन्माननीय एकनाथराव शिंदे साहेब यांच्या बद्दल ग्रामीण भागातील महिला सुद्धा अत्यंत उत्साहाने व वेगळ्या विश्वासाने शिवसेनेमध्ये सहभाग नोंदवताना दिसून येत आहेत. हाच विश्वास आमच्यासाठी शिवसेना वाढीसाठी आत्मविश्वास बळवणारा आहे. मला खात्री आहे या राज्यामध्ये एक ना एक दिवस एकनाथराव शिंदे  यांच्या नेतृत्वामध्ये शिवसेनेचा भगवा ध्वज विधानसभेवर फडकल्याशिवाय राहणार नाही. एकनाथराव शिंदे साहेब यांचे काम करण्याची पद्धत कार्यकर्त्याच्या पाठीवर कौतुकाची दिली जाणारी थाप, दिलेला शब्द पाळणारा नेता ,एक दिलदार नेता ,दमदार नेता ,कर्तृत्वान वक्तृत्ववान आणि नेतृत्व गुण संपन्न असणारा नेता आम्हा तमाम शिवसैनिकाला लाभलेला आहे. यामुळे महाराष्ट्रामध्ये निश्चित शिवसेनेचा वटवृक्ष जोमाने वाढल्याशिवाय राहणार नाही. आणि हा भगवा ध्वज महाराष्ट्राचं रक्षण करण्यासाठी महाराष्ट्रातल्या जनतेचे जीवनमान कायापालट करण्यासाठी भविष्यकाळात शिवसेना एक मजबूत पक्ष म्हणून उभा राहिलेला आपणा सर्वांना दिसेल. शिवसेनाप्रमुखाचां निष्ठावान, धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या तालमीत वाढलेला हा नेता महाराष्ट्राला निश्चितच दिशादर्शक ठरणारा आहे. ही अत्यंत स्वाभिमानाची बाबआहे.  दिनांक 9 फेब्रुवारी हा एकनाथ शिंदे साहेबांचा वाढदिवस या दिवशी महाराष्ट्रातली जनता एकनाथ शिंदे साहेब यांच्या पाठीशी मजबूत उभं तर टाकणार आहेच  परंतु तमाम महाराष्ट्रातल्या मायमाऊल्या, वडीलधारी मंडळी, शेतकरी, तरुण हे निश्चित एकनाथ शिंदे साहेबाला दीर्घायुष्य लाभाव यासाठी परमेश्वराकडे प्रार्थना करीत आहेत.  दिनांक नऊ फेब्रुवारी रोजी लातूर जिल्ह्यामध्ये निलंगा देवणी, औसा व शिरूर अनंतपाळ या तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात एकनाथ शिंदे साहेब यांचा वाढदिवस अत्यंत उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. यासाठी यासाठी तमाम शिवसैनिकांनी पदाधिकाऱ्याने माननीय एकनाथ शिंदे साहेब यांचे विचार सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचवावेत असे आव्हान जिल्हा प्रमुख शिवाजी माने यांनी केले. यावेळी महिला आघाडी जिल्हा संपर्कप्रमुख सौ रंजनाताई कुलकर्णी यांनी महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणी एकनाथ शिंदे साहेब यांना आशीर्वाद देण्यासाठी परमेश्वराकडे प्रार्थना करीत आहेत. हा नेता सर्वसामान्यांचे देणे लागतो या भावनेतून केलेलं काम महाराष्ट्राला दाखवलेली दिशाआहे. भविष्यात महाराष्ट्र घडणार कसा याबाबतीत जर विचार केला तर महाराष्ट्राला एकमेव आशेचा किरण दिसतो तो म्हणजे एकनाथ शिंदे साहेब. या साहेबांना आपण सर्वांनी वाढदिवसाच्या निमित्ताने भरभरून आशीर्वाद द्यावेत असे आव्हान रंजनाताई कुलकर्णी यांनी केले. एकूण 61 शाखा फक्त महिला आघाडीच्या स्थापन करण्याचा मानस शिवसेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी केलेला असून आज झालेल्या शिवसेनेच्या महिला आघाडीच्या शाखेच्या स्थापने प्रसंगी विधान परिषदेच्या उपसभापती तथा शिवसेनेच्या नेत्या नीलम ताई गोऱ्हे यांनी शिवसेना शाखा स्थापन होते वेळी आलेल्या सर्व महिला शिवसैनिकांचं मनस्वी हार्दिक स्वागत करून त्यांच्याशी संवाद साधला. व त्यांना राज्याचे उपमुख्यमंत्री शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब यांचे हात बळकट करण्यासाठीचे आवाहन केले आणि शिवसेनेची शाखा शाखेची पाळमुळं समाजाच्या सेवेसाठी मजबूत पद्धतीने रोवली जातील अशी अपेक्षा व्यक्त करून शिवसेनेच्या महिला आघाडीच्या सर्व पदाधिकाऱ्यांना शिवसेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांना हार्दिक शुभेच्छा दिल्या.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने