दिनांक 18 फेब्रुवारी 2025 रोजी हनुमंतवाडी हाडोळी तालुका निलंगा जिल्हा लातूर येथे शिवसेनेची शाखा शिवसेना जिल्हाप्रमुख शिवाजीराव माने यांच्या हस्ते स्थापन करण्यात आली. शाखेच्या बोर्डाचे अनावरण करून शाखाप्रमुख ज्ञानेश्वर खुर्द, उपशाखाप्रमुख विजयकुमार खुर्द, शाखा सचिव समीर शेख ,शाखा सहसचिव हरे कृष्ण व्हरगळे, मार्ग सुनील खुर्द ,सदस्य मुकुंद खुर्द ,कृष्णा खुर्द, मेघनाथ मुळे, महादू दाळंबे, विठ्ठल खुर्द,माऊली डोरले, माधव व्हरगळे, माधव खुर्द, प्रेमनाथ डोरले ,बाबजी खुर्द ,काशिनाथ शिंदे ,गुलचंद पाटील, प्रदीप खुर्द, राहुल मुळे ,विशाल कळसे प्रशांत खुर्द ,नितीन डोरले, बाजीराव डोरले, उमाकांत खुर्द अशी कार्यकारणी निवड करून जिल्हाप्रमुख माने यांनी सर्व पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या .तसेच याप्रसंगी शिवाजी माने म्हणाले की सन्माननीय एकनाथराव शिंदे साहेब हे या राज्याला मिळालेले एक उत्तुंग नेतृत्व असून एकनाथ शिंदे साहेब यांनी या महाराष्ट्रातील सर्वसामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून घेतलेले निर्णय, कामाची पद्धत, पदाधिकारी आणि शिवसैनिका बद्दल असणारी आपुलकी हे अत्यंत महत्त्वाची बाब असून, शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे निष्ठावान शिवसैनिक आहेत धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या तालमीत वाढलेले शिवसेनेला सक्षम भरारी देणार नेतृत्व म्हणजे एकनाथ शिंदे साहेब आहेत. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आदरणीय एकनाथ शिंदे साहेबा बद्दल अत्यंत विश्वासार्हता निर्माण झालेली असून बऱ्याचशा पक्षातील लोक आज एकनाथ शिंदे साहेब यांच्यावर विश्वास ठेवून शिवसेनेमध्ये प्रवेश करीत आहेत. आपल्या जिल्ह्यात सुद्धा अनेक लोकांनी प्रवेश केलेला आहे. आज आपण आपल्या गावामध्ये शिंदे साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शिवसेनेची शाखा स्थापन केलात ही शाखा या गावातील सर्वसामान्य माणसाला आमचं आधारभूत केंद्र आहे असं वाटलं पाहिजे. अशा पद्धतीचं काम आपल्या हातून व्हावं लोकांना संकट समयी धावून जाणं मदतीला जाणं वेगवेगळ्या योजनेचा लाभ त्यांच्या घरापर्यंत पोहोचवणं हे माझ्या पदाधिकाऱ्याचं काम असून या पद्धतीचे नियोजन केल्यास निश्चित स्वरूपाने हे गाव 100% तुमच्या पाठीमागे आशीर्वाद देण्यासाठी उभ राहील असा आत्मविश्वास मला वाटतो आणि आपण ते कराल असे आव्हान शिवसेना जिल्हाप्रमुख शिवाजी माने यांनी केले .
याप्रसंगी तालुकाप्रमुख तानाजी सुरवसे, उपजिल्हाप्रमुख विनोदा आर्य, युवा सेना जिल्हाप्रमुख युवराज वंजारे यांनी शाखेतील पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या तसेच या कार्यक्रमासाठी युवासेना उपजिल्हाप्रमुख प्रसाद भोसले, लक्ष्मण दनाने, बालाजी माने ,अशोक जाधव, व्यंकट राजे, खंडू मनाळे, महेश चांदणे ,राहुल माने, किरण माने, उपस्थित होते.
Tags
The महाराष्ट्र News