निलंगेकर परिवाराचे भाजपा नेते राजेश कराड यांच्याकडून सांत्वन
लातूर दि.१९- माजी मुख्यमंत्री स्वर्गीय शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या पत्नी जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आ. संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या आजी सुशीलाबाई शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचे नुकतेच दुःखद निधन झाले. भाजपाचे नेते श्रीसंत गोपाळ बुवा महाराज साखर कारखान्याचे चेअरमन राजेश कराड यांनी निलंगा येथे निलंगेकर परिवाराची भेट घेऊन सांत्वन केले.
गेल्या रविवारी राञी सुशिलाबाई शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचे दुःखद निधन झाले त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात सोमवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. सदरील दुःख द घटनेची माहिती मिळाल्याने १९ फेब्रुवारी २०२५ रोजी भाजपा नेते राजेश कराड यांनी निलंगा येथे निवासस्थानी जाऊन स्वर्गीय सुशिलाबाई आईसाहेब यांच्या प्रतिमेचे दर्शन घेऊन आदरांजली अर्पण करून निलंगेकर कुटुंबीयांचे सांत्वन केले.
यावेळी निलंगेकर कुटुंबातील विजयकुमार पाटील, डॉ. शरद पाटील, अशोकराव पाटील त्याचबरोबर आ. संभाजीराव पाटील आणि अरविंद पाटील निलंगेकर होते. याप्रसंगी राजेश कराड यांच्यासमवेत भाजपा किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष विक्रमकाका शिंदे, प्रदीप पाटील खंडापूरकर,ओबीसी मोर्चाचे भागवत सोट, प्रदेश भाजपाचे अमोल पाटील, पंचायत राज सेलचे जिल्हा संयोजक नवनाथ भोसले, लातूर तालुका अध्यक्ष बन्सी भिसे, प्रताप पाटील, राजकिरण साठे, शशिकांत पाटील यांच्यासह इतर अनेक जण होते.
Tags
The महाराष्ट्र News