• Story 1
  • Story 2
  • Story 3
  • Story 4
  • Story 5

जिल्हा क्षयरोग केंद्र, लातूर व महाराष्ट्र राज्य रिचारीका संघटनायांच्या संयुक्त विद्यमाने क्षयरोग विषयक जनजागृती कार्यक्रम.

जिल्हा क्षयरोग केंद्र, लातूर व महाराष्ट्र राज्य रिचारीका संघटना
यांच्या संयुक्त विद्यमाने क्षयरोग विषयक जनजागृती कार्यक्रम

लातूर, दि.6:-  महाराष्ट्र राज्य परिचारीका संघटना व लातूर जिल्हा क्षयरोग केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने नुकताच तिळगूळ व क्षयरोग जनजागृती कार्यक्रम विलासराव देशमुख शासकीय वैद्यकिय महाविद्यालय येथे आयोजित करण्यात आला होता.

तसेच क्षयरोग जनजागृतीपर रांगोळी स्पर्धा व पोस्टर प्रदर्शन स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धेमध्ये महाविद्यालयातील नर्सींगचे विद्यार्थी व स्टाफ नर्स यांनी सहभाग नोंदविला. प्रथम, व्दितीय, तृतीय व उत्तेजनार्थ क्रमांक प्राप्त येणाऱ्या स्पर्धकांना प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले.

जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.एस.एन.तांबारे यांनी क्षयरोग विषयक जनजागृतीचे महत्व १०० दिवसीय टिबी मोहिमेचे उद्दिष्ट, अतिजोखमीच्या व्यक्तींची तपासणी, निदान, उपचार, टिबी प्रतिबंधात्मक उपचार या बाबत माहिती दिली.

सहयोगी प्राध्यापक डॉ. विमल होळंबे यांनी आहार, आरोग्य व व्यायामाचे महत्व सांगितले.  त्याचबरोबर समाजात टिबीविषयी गैरसमज आहेत, ते दूर होणे आवश्यक आहे, असे सांगीतले. डॉ.नम्रता आचार्य यांनी मानसिक आरोग्य व क्षयरोग याबाबत माहिती दिली.

कार्यक्रमासाठी जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.एस.एन.तांबारे, वैद्यकिय अधिकारी डॉ. अलका बांगर, तसेच विलासराव देशमुख शासकीय वैद्यकिय महाविद्यालय येथील डॉ.होळंबे, डॉ.आचार्य, श्रीमती पोहरे, छाया चव्हाण, किरण निकम, सुमीत्रा तोटे, एस.एस.तोरणेकर, हेमलता चोरघडे, गाझी ए.एफ., प्रशांत मस्के,  तसेच स्टाफ नर्स, नर्सींग विद्यार्थी उपस्थीत होते.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने