• Story 1
  • Story 2
  • Story 3
  • Story 4
  • Story 5

सरदर्गा-कोरंगळा मार्गावरील बंद झालेली बस सेवा पूर्ववत सुरू ग्रामस्थांनी मानले आ. रमेशआप्पा कराड यांचे आभार

सरदर्गा-कोरंगळा मार्गावरील बंद झालेली बस सेवा पूर्ववत 
सुरू ग्रामस्थांनी मानले आ. रमेशआप्पा कराड यांचे आभार
लातूर दि.०३- गेल्या पंधरा दिवसापासून बंद झालेली लातूर ग्रामीण मतदार संघातील मौजे समंदर्गा, कोरंगळा मार्गावरील बस सेवा भाजपाचे नेते आमदार श्री रमेशआप्पा कराड यांच्या सूचनेवरून रापमच्या अधिकाऱ्यानी तात्काळ सुरू केली. गावात बस येताच ग्रामस्थांनी वाहक चालक यांचे जंगी स्वागत करून बससेवा सुरळीत सुरू केल्याबद्दल आमदार महोदयाचे जाहीर आभार व्यक्त केले.
           कोरंगळा येथे गेल्या १६ जानेवारी रोजी बस थांबून वाहकाला मारहाण केल्याने तेव्हापासून समंदर्गा-कोरंगळा मार्गावरील बस सेवा बंद झाली होती. बस सेवा बंद असल्याने सर्वसामान्य प्रवाशासह शालेय विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय निर्माण झाली होती सदरील नागरिकांच्या प्रवासाची अडचण लक्षात घेऊन लातूर ग्रामीणचे आमदार रमेशआप्पा कराड यांनी रापमच्या विभाग नियंत्रक अश्वजीत जानराव यांना कोणाच्यातरी चुकीमुळे सर्वसामान्य जनतेला वेठीस धरणे चुकीचे आहे असे सांगून तातडीने बस सेवा पूर्ववत सुरू करावी अशी सूचना केली होती. आ. कराड यांनी केलेल्या सूचनेनुसार परिवहन महामंडळाचे अधिकारी यांनी तात्काळ कार्यवाही करून बस सेवा सुरू केली जाईल असे सांगितले होते. 
          आमदार रमेशआप्पा कराड यांच्या सूचनेमुळे ३ फेब्रुवारी सोमवारी सकाळी समंदर्गा कोरंगळा मार्गावर तब्बल पंधरा दिवसानंतर बस सेवा सुरू झाल्याने त्या मार्गावरील ग्रामस्थानी आनंद व्यक्त केला. बस सेवा चालू झाल्यामुळे समदर्गा बस स्थानकावर ग्रामस्थांनी औसा आगार प्रमुख स्वामी यांच्यासह चालक, वाहक यांचा सत्कार करून या मार्गावरील सर्व बससेवा पूर्वी प्रमाणे कायमस्वरूपी सुरू ठेवावी व प्रवाश्यांची होणारी गैरसोय दूर करावी अशी विनंती केली.
        बंद झालेली बस सेवा सुरू करण्यासाठी तातडीने संबंधितांना सूचना केल्या व बस सेवा सुरू केल्याबद्दल लातूर ग्रामीणचे आदरणीय आमदार रमेशआप्पा कराड साहेब यांचे ग्रामस्थांच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले. बस चालू व्हावी यासाठी प्रयत्नशील असलेले पत्रकार किशोर जोशी, मल्हारी गोमदे यांचेही ग्रामस्थांच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले. याप्रसंगी सरपंच उद्धव काळे, तंटामुक्त समिती अध्यक्ष गोविंद ढोक, माजी उपसरपंच जगन्नाथ आण्णा ढोक, माजी तंटामुक्त समिती अध्यक्ष सुग्रीव मामा पाटील, माजी सरपंच संजय ढोक, ह.भ.प. नवनाथ महाराज सुतार, ग्राम पंचायत सदस्य दिगंबर माळी, हणमंत तिडके, बालाजी तिडके, खंडू काळे, दत्तू सुरवसे, राजेंद्र कसबे, केरबा तिडके, आत्माराम पाटील, हरिश्चंद्र चेंडके व ग्रामस्थ मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने