• Story 1
  • Story 2
  • Story 3
  • Story 4
  • Story 5

एकनाथ शिंदे यांच्या लोकाभिमुख निर्णयामुळेच राज्यात पुन्हा महायुती सरकार - शिवाजीराव माने

एकनाथ शिंदे यांच्या लोकाभिमुख निर्णयामुळेच राज्यात पुन्हा महायुती सरकार - शिवाजीराव माने

मसलगा येथे शिवसेनेच्या शाखेची स्थापना 
लातूर प्रतिनिधी: महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा उपमुख्यमंत्री शिवसेनेचे मुख्यनेते एकनाथराव शिंदे यांच्या लोकाभिमुख निर्णयामुळेच राज्यात प्रचंड बहुमताचे महायुती सरकार राज्यात आले आहे. असे मसलगा येथील शिवसेना शाखेच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना शिवसेनेचे लातूर जिल्हा प्रमुख शिवाजीराव माने यांनी सांगितले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना एकनाथराव शिंदे यांनी महिलांसाठी लाडकी बहीण, महिलांना बस अर्धे तिकिट, एक रूपयात पिकविमा योजना, नैसर्गिक आपत्तीत शेतकऱ्यांना हेक्टरी मदत दुप्पट, शेतकऱ्यांना पीएम किसान च्या धर्ती नमो शेतकरी योजना, हजारो रूग्णांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मदत, लाडका भाऊ योजना अशा अनेक लोकाभिमुख योजना प्रभावीपणे राबविल्यामुळेच राज्यात प्रचंड बहुमताचे महायुती सरकार राज्यात आले. शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारधारेवर शिवसेना मुख्य नेते सन्माननीय एकनाथराव शिंदे यांच्या नेतृत्वाखाली जनतेच्या सेवेसाठी शिवसैनिक सदैव तत्पर राहील अशी ग्वाही शिवसेना लातूर जिल्हाप्रमुख शिवाजीराव माने यांनी दिली.

मसलगा येथील शिवसैनिक माधवराव मोहिते यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या शाखेची स्थापना जिल्हा प्रमुख शिवाजीराव माने यांच्या शुभहस्ते फित कापुन फलकाचे अनावरण करण्यात आले.  यावेळी शिवसेनेच्या लातूर संपर्क प्रमुख रंजनाताई कुलकर्णी, उपजिल्हा प्रमुख सुधीर पाटील, महिला आघाडीच्या लातूर जिल्हा प्रमुख सो. अर्चनाताई बिरादार, युवासेनेचे लातूर जिल्हा प्रमुख युवराज वंजारी, औसा तालुका प्रमुख तानाजी सुरवसे, निलंगा तालुका प्रमुख भगवान जाधव, विष्णु साबदे, बाबुराव शेळके, किरण सोमवंशी, बाबु दंडिमे, सोमेश्वर लक्षेट्टे, निलंगा उप तालुका प्रमुख नागमनी म्हेत्रे, निलंगा शहर प्रमुख बबीता कोरके आदी शिवसेनेच्या प्रमुख नेत्यांची उपस्थिती होती. तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ नागरिक भालचंद्र पाटील हे होते.

यावेळी श्रीमंत जाधव, चंदर पवार, धोंडीराम पिंड, राजेश पिंड, विशाल पाटील, ओम बिरादार, हाजु सय्यद, किशोर तोरखडे, संजय तेलंगे, हारी पिंड, महेश मोहिते, भास्कर शिंदे, नवनाथ नरहारे, संजय घोडके, गफुर सय्यद, वैभव पाटील, शांतेश्वर तेलंगे, सावित्रीबाई मोहिते, शोभा तेलंगे, सोजरबाई रणदिवे आदींसह शिवसैनिक, गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने