गातेगावच्या श्री राधाकृष्ण आश्रम परिसरात
दोन कोटी रुपयांच्या विकास कामाचा शुभारंभ.
लातूर दि. १० - लातूर तालुक्यातील मौजे गातेगाव येथील श्री राधाकृष्ण आश्रम परिसरातील दोन कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास कामाचा शुभारंभ भाजपाचे युवा नेते ऋषिकेश दादा रमेश आप्पा कराड यांच्या शुभहस्ते सोमवारी सकाळी श्रीफळ फोडून करण्यात आले. याप्रसंगी जिल्हा बँकेचे माजी चेअरमन नाथसिंह देशमुख यांच्यासह अनेकांची प्रमुख उपस्थिती होती.
परमपूज्य विद्यानंदजी सागर महाराज यांच्या अध्यात्मिक कार्यातून श्री राधाकृष्ण अध्यात्म आश्रम कार्यरत असून या आश्रमात नियमित येणाऱ्या भाविक भक्तांची वाढती संख्या लक्षात घेऊन या परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी भाजपाचे नेते आ. रमेशआप्पा कराड यांनी राज्याच्या ग्रामीण तीर्थक्षेत्र विकास योजनेतून तब्बल दोन कोटी रुपयांचा निधी मंजूर करून आणला. या निधीतून आश्रम परिसरात भक्तनिवास बांधकाम, सिमेंट काँक्रीट रस्ता व नाली बांधकाम आणि कंपाउंड वॉल चे बांधकाम करण्यात येत आहेत. सदरील कामाचा शुभारंभ दहा मार्च सोमवार रोजी भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेश सचिव तथा युवा नेते ऋषिकेशदादा रमेशआप्पा कराड यांच्या शुभहस्ते श्रीफळ फोडून करण्यात आला. याप्रसंगी जिल्हा बँकेचे माजी चेअरमन नाथसिंह देशमुख, भाजपाचे सुरज शिंदे, प्रताप पाटील, विनायक मगर, प्रशांत शिंदे, वैजनाथ लवटे यांच्यासह सरपंच राजाभाऊ डोणे उपसरपंच ज्ञानेश्वर जुगल माजी सरपंच राजाभाऊ डोणे, भागवत कदम यांची प्रमुख उपस्थिती होती.
श्री राधाकृष्ण मंदिर परिसराचा विकास व्हावा ही पांडुरंगाचीच इच्छा आहे आपण फक्त नाममात्र आहोत असे सांगून या परिसराच्या विकासासाठी भाविक भक्ताच्या सोयी सुविधेसाठी आणखी निधीची गरज पडली तर आमदार रमेशआप्पांच्या माध्यमातून राज्य शासनाकडून आणखी निधी मिळवून घेऊ असे ऋषिकेश दादा कराड यांनी बोलून दाखविले. प्रारंभी उपसरपंच ज्ञानेश्वर जुगल यांनी प्रास्ताविक करून माहिती दिली. शेवटी बाळासाहेब चौडे यांनी आभार मानले
यावेळी बंडूनाना माळी, महादेव खोसे, मधुकर माळी, बाळासाहेब चौडे, कृष्णा भोसले, लक्ष्मण खलंग्रे, श्रीराम पाटील, आकाश पाटील, सचिन देशमुख, शिवशंकर शेटे, माधव खोशे, भारत हुडे, किचक माळी, बाळू लाळगे, अमित जावळे, गोविंद फावडे, दीपक बनसोडे, रोहन व्यवहारे, ओमकार हुडे, अभिषेक फावडे, हनुमंत जगताप यांच्यासह ग्रामस्थ भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Tags
The महाराष्ट्र News