• Story 1
  • Story 2
  • Story 3
  • Story 4
  • Story 5

संघटनात्मक बांधणीवर जे पदाधिकारी लक्ष देतील त्यांचा निश्चित सन्मान करून न्याय दिला जाईल-शिवसेना जिल्हाप्रमुख शिवाजी माने

संघटनात्मक बांधणीवर जे पदाधिकारी लक्ष देतील त्यांचा निश्चित सन्मान करून न्याय दिला जाईल शिवसेना जिल्हाप्रमुख शिवाजी माने
लातूर जिल्ह्यातील निलंगा, देवणी, शिरूर अनंतपाळ व औसा या तालुक्यातील शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक आज दिनांक 13 मार्च 2025 रोजी शासकीय विश्रामगृह निलंगा येथे शिवसेना जिल्हाप्रमुख शिवाजीराव माने यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती .यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख शिवाजीराव माने म्हणाले की शिवसेनेचे मुख्य नेते महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय एकनाथराव शिंदे साहेब अहोरात्र मेहनत घेऊन शिवसेना वाढवण्यासाठी खूप प्रयत्न करत आहेत. आणि आपणही आपल्या जिल्ह्यामध्ये शिवसेना वाढीसाठी प्रयत्नशील राहणं गरजेचं आहे,
 नाही केलंच पाहिजे जे कोणी शिवसेनेचे पदाधिकारी शिवसेनेची बांधणी व्यवस्थित पद्धतीने करण्यासाठी मेहनत घेतील संघटनेची शिस्त पाळून संघटनेची बांधणी व्यवस्थित करून लोकांचा विश्वास सार्थ करून शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब यांच्या मनातली शिवसेना लातूरमध्ये रुजवण्यासाठी प्रयत्न करतील या सर्व पदाधिकाऱ्यांचा योग्य तो सन्मान केला जाईल. यासाठी वरील चारही तालुक्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी आपापल्या कार्यक्षेत्रामध्ये गाव तिथे शाखा घर तिथे शिवसैनिक शाखाप्रमुख बुद्ध प्रमुख गटप्रमुख आणि शिवदूत नेमणुका केल्याच पाहिजेत.
शिवसेनेचे मुख्य नेते राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय नामदार एकनाथराव शिंदे साहेब यांच्या आदेशावरून शिवसेना सचिव सन्माननीय मोरे साहेब मराठवाडा विभागीय संपर्कप्रमुख आनंदराव जाधव साहेब लातूर जिल्हा संपर्कप्रमुख माननीय बालाजीराव काकडे साहेब महिला आघाडीच्या संपर्कप्रमुख सौभाग्यवती रंजनाताई कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली लातूर जिल्ह्यामध्ये शिवसेना सदस्य मोहीम शिवकार्य या रूपाने चालू आहे ही मोहीम मोठ्या प्रमाणात शिवसेना सदस्य नोंदणी करून साजरी केली पाहिजे गावागावांमध्ये कॅम्प घेऊन घराघरापर्यंत जाऊन शिवसेना सदस्य नोंदणी केली पाहिजे.आजची परिस्थिती सन्माननीय एकनाथराव शिंदे साहेबांचं साधं नाव जरी घेतलं तरी लोक होय असा नेता या महाराष्ट्राला हवा आहे असं बोललेलं ऐकून खूप खूप बरं वाटतं. मला खात्री आहे एकनाथ शिंदे साहेबांनी घेतलेली निर्णय अहोरात्र घेत असलेली मेहनत महाराष्ट्रातल्या तळागाळातल्या सर्वसामान्य माणसाच्या मनावर अधिराज्य केलेले काम हे शिवसेनेला बळकटी देणार निश्चित माध्यम ठरणार आहे. यासाठी आपण सर्व पदाधिकाऱ्यांनी तात्काळ कामाला लागावं आणि लवकरात लवकर शिवसेनेची वज्रमूठ मजबूत करावी. लातूर जिल्ह्यामध्ये शिवसेना पुन्हा एकदा जोमाने उभी टाकलेले चित्र एकनाथराव शिंदे साहेब यांच्या नजरेत भरल असं कार्य आपणाकडून अपेक्षित आहे. आपण सर्वजण एकनाथराव शिंदे साहेब यांना अभिप्रेत असनारी शिवसेना उभी करालच असा आत्मविश्वास मला आहे .असे उद्गार शिवसेना जिल्हाप्रमुख शिवाजी माने यावेळी बैठकीदरम्यान काढले .यावेळी काही पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्याही जिल्हाप्रमुख यांनी केल्या आहेत. यामध्ये महिला आघाडी तालुकाप्रमुख औसा उषाताई बालाजीराव जाधव, माधव व्यंकटराव नाईकवाडे निलंगा उपशहर प्रमुख निलंगा, सौ बबीता निळकंठ कोरके महिला शहरप्रमुख निलंगा, बालाजी शंकर भुरे उपतालुकाप्रमुख देवणी, यशवंत भानुदास ठाकरे तालुका संघटक देवणी, दादाराव सुभान धुमाळ उपविभाग प्रमुख शेडोळ, महेबुब ताजुद्दीन अख्तर अल्पसंख्यांक तालुकाप्रमुख निलंगा ,श्रीनिवास चंद्रशेखर तोकले युवासेना तालुका उप प्रमुख निलंगा ,अशा पदाधिकाऱ्याच्या नियुक्त्या जिल्हाप्रमुख शिवाजी माने यांनी केल्या यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख विनोद आर्य, औसा सुधीर पाटील उपजिल्हाप्रमुख निलंगा, अर्चनाताई बिरादार महिला आघाडी जिल्हाप्रमुख, विधीज्ञ वर्षाताई शिंदे महिला आघाडी तालुकाप्रमुख शिरूर अनंतपाळ ,उषाताई जाधव महिला आघाडी तालुकाप्रमुख औसा, भगवान जाधव तालुकाप्रमुख निलंगा ,विकास शिंदे तालुकाप्रमुख शिरूर अनंतपाळ ,धनराज बिरादार तालुकाप्रमुख देवणी ,मुस्तफा शेख शहर प्रमुख निलंगा, विनोद धुमाळे शहर प्रमुख शिरूर अनंतपाळ ,पप्पू भाई शहरप्रमुख देवणी, सहदेव कोळपे तालुका उपप्रमुख औसा, केदार पाटील युवा सेना तालुकाप्रमुख असे अनेक पदाधिकारी शिवसैनिक उपस्थित होते


टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने