• Story 1
  • Story 2
  • Story 3
  • Story 4
  • Story 5

माऊली बाबासाहेब गिरी च्या हत्यारांवर मोका अंतर्गत गुन्हा नोंदव न्याची :-दसनाम गोसावी समाजाची मागणी.



माऊली बाबासाहेब गिरी रा. दुधोडी ता. भूम जि. धाराशिव यांस विकृत व निर्दयीपणे अमानुष मारहाण करुन हत्या करणाऱ्या मारेकऱ्यांना मोक्का व अपहरण, खंडणीचा गुन्हा
नोंदवुन तात्काळ अटक करावी अशी मागणी लातूर दसनाम गोसावी समाज उत्कर्ष मांडलाची मागणी.
 माऊली बाबासाहेब गिरी या
गरीब समाजातील मुलाची संगणमत करुन आरोपींनी विकृतीपणे शारीरिक व मानसिक
छळ करुन अमानुष मारहाण करण्यात आली आहे. मारहाण करणारे हे जवळच राहणारे
सतिश जगताप व इतर सात आठ जणांनी मिळुन जीव घेण्याच्या हेतुने निर्दयी मारहाण
केली होती. त्याला जखमी अवस्थेत सोलापूर येथे पुढील उपचारासाठी नेले होते. उपचारादरम्यान
त्याचा मृत्यू झाला.
माऊली गिरीच्या मृत्यूपूर्वी आरोपींविरुध्द साधारण गुन्हा नोंदविला आहे. पण हे
चुकीचे व दुर्दैवी असून त्या आरोपीविरुध्द मोक्का, अपहरण व खंडणीचा गुन्हा नोंदवुन
तत्काळ अटक करावी. सदरील आरोपी हे सराईत गुन्हेगार असून त्याच्याकडून
माऊली गिरीच्या परिवाराच्या जीवाला धोका निर्माण झाला असून त्या परिवाराला पोलीस
संरक्षण देण्यात यावे. तसेच अशा स्वरुपाच्या गुन्ह्यांची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून महाराष्ट्र
शासनाने सदरील गुन्हा नोंदविला जावा.
सबब हे निवेदन सादर करत आहोत.
निवेदक,

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने