लातूर कॉलेज ऑफ फिजोथेरपीचा निकाल मराठवाडा विभागात उत्कृष्ट
लातूर प्रतिनिधी :- महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक अंतर्गत घेण्यात आलेल्या हिवाळी परीक्षा २०२४ मध्ये श्री वेताळेश्वर शिक्षण संस्था संचलित लातूर कॉलेज ऑफ फिजिओथेरपी महाविद्यालया चा प्रथम वर्षाचा निकाल मराठवाडा विभागांमध्ये उत्कृष्ट लागला आहे. महाविद्यालयात प्रथम वर्गाची विद्यार्थिनी प्रथम क्रमांक ऋतुजा आदिल ७३ टक्के, द्वितीय क्रमांक गायत्री लांडगे ६८ टक्के, तृतीय क्रमांक प्रीती वाकडे ६७ टक्के आणि अंतिम वर्षाचा निकाल ९५ टक्के लागला असून प्रथम क्रमांक अक्षता लामतुरे ७४ टक्के, द्वितीय क्रमांक निशाद सय्यद ६८.१२ टक्के तर तृतीय क्रमांक वैष्णवी मुंगळीकर ६८ टक्के तसेच २५ विद्यार्थी विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाले आहेत .या गुणवंत विद्यार्थिनीचे कौतुक संस्थेचे अध्यक्ष भीमाशंकर बावगे,सचिव वेताळेश्वर बावगे , संचालक नंदकिशोर बावगे, संचलिका माधुरी बावगे, प्राचार्य डॉ विरेंद्र मेश्राम, डॉ पल्लवी तायडे, डॉ श्रद्धा नागमोडे, डॉ शारदा धडे, डॉ.अखिलेश बिवलकर, डॉ. प्रतिभा शेटकर, डॉ. गायत्री बतकुलवार डॉ. शितल कोलगे डॉ.अर्निका राजपुरिया तसेच लातूर कॉलेज ऑफ फार्मसी लातूर, राजीव गांधी इन्स्टिट्यूट ऑफ पॉलीटेक्निक, लातूर कॉलेज ऑफ फार्मसी हासेगाव, लातूर कॉलेज ऑफ आयटीआय, लातूर कॉलेज ऑफ सायन्स ,ज्ञानसागर विद्यालय, गुरुनाथप्पा बावगे इंटरनॅशनल इंग्लिश स्कूल या सर्व युनिटच्या प्राचार्यांनी पुढील भविष्याच्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिले.
Tags
The महाराष्ट्र News