
लातूर प्रतिनिधी :यंदा प्रथमच नीट परीक्षा आयोजनाची जिल्हास्तरावरील जबाबदारी जिल्हाधिकारी यांच्याकडे देण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी नीट परीक्षा केंद्रांवर विविध सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचना दिल्या होत्या.

या सूचनांच्या अंमलबजावणीचा त्यांनी आज प्रत्यक्ष परीक्षा केंद्रांना भेट देऊन आढावा घेतला. तसेच या ठिकाणी उपस्थित पालक, अधिकारी, कर्मचारी यांच्याशी संवाद साधला.
तसेंच नीट परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना वाहतूक कोंडी होवू नये, यासाठी जिल्हा प्रशासनाने खबरदारी घेतली आहे. परीक्षा केंद्रावर विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत, असे जिल्हाधिकारी यावेळी म्हणाल्या.

या प्रसंगी नीट परीक्षेचे नियोजन एक नंबर झाल्याची प्रतिक्रिया पालकांनी जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांच्याशी संवाद साधताना व्यक्त केली.