• Story 1
  • Story 2
  • Story 3
  • Story 4
  • Story 5

भाजप नेत्या अर्चनाताई पाटील चाकूरकर यांनी राज्याचे मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांची नांदेड विमानतळ येथे भेट घेत लातूर शहर व जिल्ह्यात अतिवृष्टी अवकाळी पाऊस व गारपीट झालेली आहे यामुळे शहर व ग्रामीण भागातील नागरिक व शेतकऱ्यांचे झालेल्या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई मिळावी अशी विनंती केली.

लातूर:29/05/2025 राज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री मा.श्री देवेंद्रभाऊ फडणवीस यांची नांदेड विमानतळ येथे भेट घेत लातूर शहर व जिल्ह्यात अतिवृष्टी अवकाळी पाऊस व गारपीट झालेली आहे यामुळे शहर व ग्रामीण भागातील नागरिक व शेतकऱ्यांचे झालेल्या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई मिळावी अशी विनंती केली. 
या अवकाळी पावसामुळे लातूर शहरातील नागरिकांच्या घरांची पडझड होवून नुकसान झालेले आहे. तसेच कचरा व्यवस्थापन ढिसाळ असल्याने विविध भागातील बहुसंख्य नागरिकांच्या घरांमध्ये पाणी साचणे, अन्न धान्याची नासाडी होणे, दैनंदिन वापरातील उपयोगी साधने वाहून जाणे, शहरातील व्यापार्यांच्या दुकानांमध्ये पाणी शिरून बहुतांश व्यापार्यांचे नुकसान झाले आहे.
तसेच ग्रामीण भागामध्ये शेती पिकांसह शेतकऱ्यांच्या फळबागांचे मोठया प्रमाणात नुकसान झालेले आहे. त्याचबरोबर बहुतांश भागात अवकाळीसह विज पडुन शेतक-यांचे पशुधनही मृत्युमुखी पडल्याच्या घटना घडल्या आहेत.
या सर्व नुकसानीचे तात्काळ सरसकट पंचनामे होणे अत्यंत गरजेचे असून याबाबत जिल्हा प्रशासनास सुचना देवून नुकसान झालेल्या भागांचे पंचनामे करण्याचे निर्देश द्यावेत व झालेल्या नुकसानीची सरसकट भरपाई मिळण्यासाठी योग्य ती कार्यवाही अनुसरण्यात यावी अशी विनंती केली.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने