• Story 1
  • Story 2
  • Story 3
  • Story 4
  • Story 5

रेणापूरकरांना दिपावली भेट; भाजपा नेते आ. कराड यांच्या प्रयत्नातून विविध रस्ते आणि नाली बांधकामासाठी ५ कोटी रुपयांचा निधी मंजूर .

रेणापूरकरांना दिपावली भेट; भाजपा नेते आ. कराड यांच्या प्रयत्नातून 
विविध रस्ते आणि नाली बांधकामासाठी ५ कोटी रुपयांचा निधी मंजूर.
         
लातूर दि. २१ -  रेणापूर येथील विविध विकास कामासाठी गेल्या आठवड्यात पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला होता. दिपावलीच्या निमित्ताने भाजपाचे नेते आमदार श्री. रमेशआप्पा कराड यांच्या प्रयत्नातून रेणापुर शहरातील विविध सिमेंट रस्ते आणि नाली बांधकामासाठी आणखी पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. सदरील निधी मंजूर झाल्याने भाजपाचे रमेशआप्पा आमदार ! कामगिरी दमदार !! अशीच भावना रेणापूरच्या नागरिकांतून व्यक्त होत आहे.
          लातूर ग्रामीण विधानसभा मतदार संघाचे आमदार श्री. रमेशआप्पा कराड यांच्या नेतृत्वात रेणापूर नगरपंचायत भाजपाच्या ताब्यात आल्यापासून राज्यातील महायुती शासनाच्या माध्यमातून कोट्यावधी रुपयाचा निधी मंजूर करून घेतला मंजूर निधीतून रेणापूर येथे नवीन पाणीपुरवठा योजना, श्री रेणुका देवी मंदिर भक्तनिवास, अशोक सम्राट बौद्ध विहार, मुस्लिम बांधवांसाठी शादीखाना, बालाजी मंदिर परिसरात भव्य सभागृह, रेणा नदीवर घाट विकसित करणे, श्री रेणुका देवी मंदिर परिसर विकासीत करणे, अहिल्यादेवी होळकर समाज मंदिर, रेड्डी समाज भवन, हनुमान मंदिर सभागृह, अंतर्गत सिमेंट रस्ते, नाली बांधकाम, पथदिवे, अंगणवाडी बांधकाम यासह विविध विकास कामे होत आहेत. यातील काही कामे झाली आहेत तर काही कामे प्रगतीपथावर आहेत इतर उर्वरित कामाला येत्या काही दिवसात प्रत्यक्ष सुरुवात होणार आहे. 
            गेल्या १४ ऑक्टोबर रोजी रेणापूर येथे ३ कोटी रुपये खर्चाचे इंनडोअर क्रीडा संकुलन, वाचनालय विकसित करण्यासाठी १ कोटी आणि बालाजी मंदिर येथील सभागृहाच्या उर्वरित बांधकामासाठी १ कोटी रुपये असे एकूण पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला होता. रेणापूर शहराच्या इतिहासात पहिल्यांदाच एवढा मोठ्या प्रमाणात आ. रमेशआप्पा कराड यांच्या माध्यमातून निधी प्राप्त झाल्याने सर्वांगीण विकासाला गती मिळाली. 
          रेणापूर शहरातील अंतर्गत रस्ते आणि नाली बांधकामासाठी निधी मिळावा यासाठी राज्याचे मुख्यमंत्री ना. देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि राज्याचे नगरविकास मंत्री तथा उपमुख्यमंत्री ना. एकनाथजी शिंदे साहेब आणि अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांच्याकडे भाजपाचे नेते आमदार श्री. रमेशआप्पा कराड यांनी वेळोवेळी पाठपुरावा केला, केलेल्या पाठपुराव्यामुळे राज्याच्या नियोजन विभागाने नागरी सेवा व सुविधा करिता सहाय्यक अनुदान योजनेतून २० ऑक्टोबर २५ रोजीच्या शासन निर्णय पत्रकांन्वये तब्बल पाच कोटी रुपयांचा निधी मंजूरी झाला आहे. त्यात प्रभाग ११ मध्ये ६० लक्ष, प्रभाग १६ मध्ये १ कोटी ५० लक्ष, प्रभाग १२ मध्ये ७० लक्ष, प्रभाग १ मध्ये २० लक्ष, प्रभाग १३ मध्ये ४० लक्ष, प्रभाग १४ मध्ये ३० लक्ष, प्रभाग १० मध्ये ५० लक्ष, प्रभाग २ मध्ये ५० लक्ष, आणि प्रभाग १५ मध्ये ३० लक्ष असे एकूण पाच कोटी रुपयांच्या कामांना मंजुरी मिळाली आहे.
          रेणापूर शहराच्या विकास कामासाठी गेल्या आठवड्यात पाच आणि आणखी पाच असे एकूण दहा कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल भाजपाचे नेते आमदार श्री. रमेशआप्पा कराड यांचे प्रथम नगराध्यक्ष अभिषेक आकनगिरे, माजी नगराध्यक्षा आरती राठोड, भाजपाचे चंद्रकांत कातळे, सुधीर तोडकरी, श्रीकृष्ण मोटेगावकर, दत्ता सरवदे, अच्युत कातळे, दिनकर राठोड, विजय चव्हाण, गणेश चव्हाण, शेख अजीम, दिलीप आकनगिरे, उत्तम चव्हाण, राजकुमार आलापुरे, उज्वल कांबळे, महेश गाडे, अंतराम चव्हाण, मारूफ आत्तार, उत्तम घोडके, रमा चव्हाण, लखन आवळे, हनुमंत अकनगिरे, धम्मानंद घोडके, संतोष राठोड, अंकुश मोटेगावकर, दिलीप चव्हाण, सोपान सातपुते, संजय वीरुळे, हनुमंत भालेराव, अमृतेश्वर स्वामी, महेश वरवटे, हरी भोळे, नंदकुमार ब़डे, शेख सलीम, शेख मकसूद, रफिक शिकलकर, शरद चक्रे, हरी पांचाळ, मनोज चक्रे, सुभाष राठोड, सचिन शिरसकर, सुरज फुलारी, दत्ता कातळे, महेश मदने, लक्ष्‍मण दळवी, शिवाजी भावे, विकी राजे, ज्ञानोबा सातपुते, आवेश कुरेशी, शेषराव पवार, परमेश्वर राठोड, समीर माने, गणेश भोकरे, अर्जुन सूर्यवंशी, रोहित खुमसे, पप्पू कुडके यांच्यासह भाजपाचे कार्यकर्ते लोकप्रतिनिधी पदाधिकारी यांनी आभार व्यक्त केले आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने