मुंबई :- लातूर येथील देबडवार मल्टीसर्व्हिसेसचे संचालक राघवेंद्र बालाजी देबडवार यांना मराठवाडा गौरव पुरस्कार - 2024 जाहीर झाला आहे. त्यांना हा पुरस्कार लघुउद्योग आणि सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीत कार्य केले त्यासाठी प्रदान करण्यात येणार आहे.
सदरील पुरस्कार भारतीय सिनेयुग प्रोडक्शन अँड अकॅडमी, मुंबई. या संस्थेकडून मिळणार आहे. हा पुरस्कार वितरण दादर, मुंबई येथील सुप्रसिद्ध शिवाजी मंदिर नाट्यगृह येथे 29 नोव्हेंबर रोजी प्रदान होणार आहे. सत्काराचे स्वरूप शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह आणि त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात येईल.
अशी माहिती संस्थेचे संचालक अनिलकुमार शिंपी यांनी दिली आहे.
हा पुरस्कार देबडवार यांना जाहीर झाला म्हणून त्यांचा संपूर्ण जिल्हयातुन पत्रकार बांधव, मित्र परिवार आणि कुटुंबियांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.