निवडणुकी दरम्यान प्रचंड पैशाचा पाऊस झाला तरीही माझा स्वाभिमानी गरीब कार्यकर्ता विकला गेला नाही. हे यश स्वाभिमानी कार्यकर्त्याच्या कष्टाचे आणि मेहनतीचे आहे. लाडक्या बहिणींनी मोठा आशीर्वाद दिला. कार्यकर्त्यांचा संघर्ष आणि त्यांनी केलेल्या कष्टातून कधीही उतराई होऊ शकत नाही. हा विजय लोकनेते स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांना समर्पित करत आहे. मतदार संघातील मतदारांनी काँग्रेस वाल्याची हुकूमशाही आणि एकाधिकारशाही मोडीत काढून नवे परिवर्तन घडवले जनतेने माझ्यावर विश्वास दाखवला या विश्वासाला कधीही तडा जाऊ देणार नाही. आणि कार्यकर्त्यांची मान खाली जाईल असे वर्तन माझ्याकडून होणार नाही अशीही ग्वाही आ. रमेशआप्पा कराड यांनी दिली.
या विजयामुळे आता कार्यकर्त्यांची जबाबदारी वाढली असून नम्रपणे जनतेच्या कायम संपर्कात राहून कामे करावीत. या पुढील काळात ग्रामपंचायत, सोसाट्यासह सर्व विविध स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत आपल्याला यश मिळवायचे आहे, सहकारी साखर कारखाने शेतकऱ्यांच्या मालकीचे करावयाचे आहेत त्याचबरोबर महाराष्ट्रात लातूर ग्रामीण मतदार संघ एक विकासाचा मॉडेल निर्माण करण्यासाठी आपला प्रयत्न राहील असे आ. रमेशआप्पा कराड यांनी बोलून दाखविले.