महाराज यांच्या मंदिरात जाऊन आरती केली व मनोभावे दर्शन घेतले. त्याचबरोबर राष्ट्रधर्म पूजक दादाराव कराड आणि त्यागमूर्ती प्रयागआक्का कराड यांच्या समाधीवर पुष्पांजली अर्पण करून विनम्र अभिवादन केले. रामेश्वर येथील निवासस्थानी माजी सरपंच ज्येष्ठ मार्गदर्शक तुळशीराम अण्णा कराड, प्रगतशील शेतकरी काशीरामनाना कराड यांचे आ. रमेशआप्पा कराड यांनी आशीर्वाद घेतले. यावेळी भाजपाचे कार्यकर्ते पदाधिकारी यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ग्रामस्थांनी केलेल्या सत्कारा बद्दल आभार व्यक्त करून प्रभू श्री राम मंदिरात बोलताना नवनिर्वाचित आमदार रमेशआप्पा कराड यांनी मी आमदार व्हावे यासाठी गेल्या वीस वर्षापासून मतदार संघातील असंख्य सर्वसामान्य कार्यकर्त्याबरोबरच ग्रामस्थांनीही परिश्रम घेतले, संघर्ष केला. या संघर्षाला आज प्रत्यक्षात यश आले. माझा विजय हा कार्यकर्त्यांच्या कष्टाचा मेहनतीचा असून विजयासाठी लाडक्या बहिणींनी मला भरभरून आशीर्वाद दिले आहेत. आता सर्वांचीच मोठी जबाबदारी वाढली आहे आपल्याला आपला मतदारसंघ विकास कामाच्या माध्यमातून एक मॉडेल मतदारसंघ निर्माण करावयाचा आहे असे बोलून दाखविले.