• Story 1
  • Story 2
  • Story 3
  • Story 4
  • Story 5

जनादेशाचा विनम्रपणे स्विकार:- डॉ अर्चना पाटील चाकूरकर


लातूर शहर विधानसभा मतदारसंघातील
मतदारांनी या निवडणूकीत 105545 इतक्या
मतांचे दान माझ्या पदरात टाकले. मात्र या
निवडणूकीत मी विजयी होवू शकले नाही.
मतदारांनी दिलेल्या या जनादेशाचा मी
विनम्रपणे स्विकार करते.
भाजपाच्या पक्षश्रेष्ठींनी माझ्यावर विश्वास
ठेवून मला उमेदवारी दिली. महायुतीचे राज्य,
जिल्हा आणि शहर मतदारसंघातील सर्व नेते,
पदाधिकारी, कार्यकर्ते, माझे
ज्ञात-अज्ञात
हितचिंतक या
कुटुंबीय,
सगळ्यांनी
माझ्यासाठी प्रचंड मेहनत घेतली. त्यामुळे मी
त्यांचे मन:पूर्वक आभार मानते.
दहशत आणि धनशक्तीला झुगारून अनेक
लोक माझ्या बाजूने उभे राहिले, हे मी कधीच
विसरणार नाही. माझ्या पाठिशी उभे
राहिलेल्यांना मी कधीच अंतर देणार नाही. या
निवडणूकीत पराभूत झाले असले तरी, मी
राजकारणाचे मैदान सोडलेले नाही. मी
कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. मी सदैव
त्यांच्या सोबत उभी राहीन, अशी ग्वाही मी देते.
राज्यात महायुतीचेच सरकार स्थापन होत
आहे. त्याला केंद्र सरकारची साथ आहे. त्यामुळे
या दोन्ही सरकारांच्या माध्यमातून लातूर शहर
मतदारसंघात विकासाची कामे खेचून
आणण्यासाठी मी कटीबध्द आहे. जनतेने मला
दिलेल्या प्रत्येक मताची परतफेड मी करेन, अशी
ग्वाही मी देते. लातूरचा विकास, हाच एकमेव
ध्यास.
मला सहकार्य केलेल्या सर्वांचे पुन्हा एकदा
आभार.
डॉ. अर्चना पाटील
चाकुरकर

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने