14 वर्षीय 1 अल्पवयीन मुलीस कोणीतरी अज्ञात व्यक्तीने पळून नेले बाबत औसा पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल होती.
मागील 06 महिन्या पासुन पोलीस स्टेशन कडून संबंधित पीडित मुलींचा शोध सुरू होता.
वरील पोलीस स्टेशनला दाखल तक्रारीबाबत पोलीस स्टेशन सह AHTU कडून समांतर तपास करण्यात येत होता.
गुप्त व तांत्रिक माहिती संकलन व विश्लेषणाचे आधारे AHTU च्या टीमने अल्पवयीन मुलींचा पुणे येथे शोध घेण्यात यश आले.
AHTU च्या पथकाने 1 दिवस शहरात मुक्काम करून 01 अल्पवयीन पीडित मुली व तिचे सोबत 1 आरोपीला ताब्यात घेतले. मिळून आलेल्या पीडित मुलगी व आरोपीस संबंधित पोलीस स्टेशनला हजर करण्यात आले आहे.
सद्या लातूर जिल्हा पोलीस दल व AHTU चे पथक ऑपरेशन मुस्कान शोध मोहीम राबवत असुन त्या दरम्यान लातूर जिल्ह्यातून पळवून नेलेल्या अल्पवयीन मुलींचा शोध घेण्याची महत्त्वाची कामगिरी पार पाडली जात आहे.
सदरची कामगिरी श्री सोमय मुंडे, पोलीस अधीक्षक, लातूर व श्री अजय देवरे, अपर पोलीस अधीक्षक, लातूर यांचे मार्गदर्शनाखाली श्रीमती बबित वाकडकर, पोलीस निरीक्षक, श्रीमती श्यामल देशमुख, श्री. सुभाष सूर्यवंशी, पोलीस उपनिरीक्षक, पोलीस अमलदार श्री. सदानंद योगी, प्रकाश जाधव, महिला अंमलदार सुधामती यादव व लता गिरी, चालक निहाल मणियार या AHTU च्या पथकाने पार पाडली आहे.