• Story 1
  • Story 2
  • Story 3
  • Story 4
  • Story 5

भाजपा युवा नेते ऋषिकेश कराड यांनी भीषण अपघातातील कारेपूरच्या जखमींची रुग्णालयात भेट घेऊन दिलासा दिला


लातूर दि.११- अंबाजोगाई शहरापासून जवळ असलेल्या वाघाळा पाटी जवळ काल मंगळवारी झालेल्या कार आणि ट्रकच्‍या भीषण अपघातातील रेणापूर तालुक्यातील मौजे कारेपूर येथील जखमी दोघा रुग्णांची भाजपाचे युवा नेते ऋषिकेशदादा कराड यांनी लातूर येथील रुग्णालयात जाऊन अस्थेवाईकपणे चौकशी केली व दिलासा दिला. 
          अंबाजोगाई कारखाना नजीक वाघाळा पाटीजवळ कारचा आणि ट्रकचा भीषण अपघात झाला या अपघातात रेणापूर तालुक्यातील मौजे कारेपूर येथील बालाजी माने, दिपक सावरे, कृतवीक गायकवाड, फारुक शेख या चौघांचे दुर्दैवी दुःखद निधन झाले तर शेख मुबारक आणि शेख अजीम या दोघांना अंबाजोगाईच्या स्वाराती रुग्णालयात उपचार करून पुढील उपचारासाठी लातूर येथील पोद्दार हॉस्‍पीटल येथे दाखल करण्यात आले आहे. सदरील घटनेची माहिती मिळल्याने भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेश सचिव युवा नेते ऋषिकेशदादा रमेशआप्पा कराड यांनी आज बुधवारी दुपारी लातूर येथील पोद्दार हॉस्पिटल येथे जाऊन जखमी शेख मुबारक आणि शेख अजीम या दोघा रुग्णांची भेट घेवून घटनेची सविस्तर माहिती जाणून घेतली व दिलासा दिला. त्याचबरोबर उपचार करणाऱ्या संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांशी चर्चा करून प्रकृतीची विचारपूस केली. यावेळी जखमी रुग्णांचे नातेवाईक जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सुरेंद्र गोडभरले, भाजपाचे भाऊसाहेब गुळबिले यांच्यासह इतर अनेक जण होते.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने