• Story 1
  • Story 2
  • Story 3
  • Story 4
  • Story 5

उदगीर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने, तालुका प्रमुख चंद्रकांत टेंगेटोल यांच्या मार्गदर्शनात सरकार चा तीव्र निषेध करण्यात आला.

उदगीर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेआज दि.१८/१२/२४ रोजी शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे) उदगीर पक्षाच्या वतीने खलील विषयावर उपजिल्हाधिकारी, गटशिक्षण अधिकारी,पोलीस उपअधीक्षक यांना निवेदन देण्यात आले.
१.मौजे.मसाजोग (बीड) सरपंच संतोष देशमुख यांची क्रूर हत्या आणि परभणी येथील विटंबना व सोमनाथ सुर्यवंशी यांची पोलिस कोठडीत झालेली हत्या या घटनेचा आणि सरकारचा जाहीर निषेध.आरोपीला लवकरात लवकर अटक करून तात्काळ फाशी देण्यात यावी..असे निवेदन उपजिल्हाधिकारी यांच्या मार्फत मा.मुख्यमंत्री साहेब यांना देण्यात आले.

यावेळी चंद्रकांत टेंगेटोल (तालुकाप्रमुख)अरुणाताई लेंडाणे (महिला आघाडी विधानसभा संपर्कप्रमुख),सचिन साबणे (शिक्षकसेना जिल्हा अध्यक्ष),अनिल पंचाक्षरी (शहरप्रमुख), ऍड विष्णु चिंतालवार,ऍड रामदास काकडे (उपतालुकाप्रमुख),व्यंकट साबणे,शिवकांत चटनाळे, लक्षमिकांत गुडमेवार,प्रदीप पाटील,संतोष निडेबने,गौतम कांबळे,अर्जुन आटोळकर,कृष्णा कंचे,करण मांजरे,सौ सरोजा बिरादार,सौ वैशाली गोटमुकले,सौ ललिता गंगणे, सौ संगीता तोंडारे आदी शिवसैनिक उपस्थित होते

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने