• Story 1
  • Story 2
  • Story 3
  • Story 4
  • Story 5

पैशाची बॅग लुटणाऱ्या आरोपी ताब्यात. 07 लाख 80 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत. स्थानिक गुन्हे शाखेची उत्कृष्ट कामगिरी.


  दिनांक 08/01/2025
पैशाची बॅग लुटणाऱ्या आरोपी ताब्यात. 07 लाख 80 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत. स्थानिक गुन्हे शाखेची उत्कृष्ट कामगिरी.
 मोटर सायकल वरून बँकेमध्ये भरण्यासाठी पैसे घेऊन जात असताना पैशाची बॅग हिसकावणाऱ्या आरोपीला अटक. रोख रक्कम व मोटरसायकलसह 07 लाख 85 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त.
 याबाबत थोडक्यात माहिती अशी की, काही दिवसा पुर्वी बाभळगाव ते बसवेश्वर चौक जाणारे रिंग रोड वर मोटार सायकल वरून घेऊन जात असलेली 7 लाख  21 हजार रुपयांची बॅग लुटण्याची घटना घडली होती. त्यावरून पोलीस ठाणे विवेकानंद चौक येथे अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस अधीक्षक श्री. सोमय मुंडे यांनी सदरचा गुन्हा उघडकीस आणण्याकरिता आदेशित केले होते. त्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, अपर पोलीस अधीक्षक डॉ.अजय देवरे, यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांचे नेतृत्वात पोलीस अधिकारी/अमलदारांचे पथक तयार करण्यात आले होते. सदर पथकामार्फत विविध गुन्हेगारांची माहिती एकत्र करून त्याचे विश्लेषण करण्यात येत होते.
सदर आरोपीचा शोध घेण्यासाठी पथक रात्र- दिवस परिश्रम घेत होते. तसेच गोपनीय बातमीदार नेमून त्यांच्याकडून माहिती घेण्यात येत होती.
दरम्यान 07/01/2025  पोलीस पथकाला गोपनीय माहिती मिळाली की, पैशाची बॅग लुटणाऱ्या गुन्ह्यातील एक आरोपी  रिंग रोड वरील मळवटी चौक परिसरात थांबलेला आहे अशी माहिती मिळाली. सदर माहितीची शहनिशा करून वरिष्ठांच्या मार्गदर्शनात नमूद गुन्हयातील संशयित आरोपीला  ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्याने त्याचे नाव 
1)अनिकेत विठ्ठल सगरे, वय 24 वर्ष, राहणार मळवटी रोड, नाथ नगर,लातूर.
असे असल्याचे सांगून तो व त्याचे  सोबतचे आणखीन पाच मित्र अशा सर्वांनी मिळून काही दिवसांपूर्वी बाभळगाव ते बसवेश्वर चौकाकडे जाणाऱ्या रिंग रोड वरून एका मोटरसायकल स्वारास अडवून त्याच्याकडील पैशाची बॅग जबरदस्तीने हिसकावून घेऊन चोरी केल्याचे सांगितले. त्यांची नावे 
2)विष्णू मांगीलाल प्रजापती, राहणार इकबाल चौक, मळवटी रोड, लातूर.
3) पवन लक्ष्मण बोयने, राहणार अराफत चौक, मळवटी रोड, लातूर.
4)शुभम शिंदे, राहणार इकबाल चौक, लातूर.
5) अमन आदम सूर्यवंशी, राहणार आझाद शाळेच्या पाठीमागे, मळवटी रोड, लातूर.
6) अमरदीप रवी काळे, राहणार म्हाडा कॉलनी, बाबळगाव रोड, लातूर.
असे असून वर नमूद आरोपींनी मिळून लातूर  पैशाची बॅग जबरदस्तीने चोरल्याचे सांगितले. नमूद आरोपी कडून गुन्ह्यातील चोरलेल्या रकमेपैकी 5 लाख 60 हजार रुपये रोख व गुन्ह्यात वापरलेले दोन मोटरसायकल हस्तगत करण्यात आले आहेत.
  अनुक्रमांक 2 ते 6 आरोपी फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. एक आरोपी व मुद्देमाल पुढील कार्यवाही करिता पोलीस ठाणे विवेकानंद चौक यांच्या ताब्यात देण्यात आले.
सदरची कारवाई वरिष्ठांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले, यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे  पोलीस उपनिरीक्षक संजय भोसले, पोलीस अमलदार  सूर्यकांत कलमे, रियाज सौदागर, सुधीर कोळसुरे, राजेश कंचे, योगेश गायकवाड ,विनोद चलवाड, तुळशीराम बरुरे, गोविंद भोसले, जमीर शेख चालक पोलिस अमलदार प्रदीप चोपणे व पोलिस ठाणे विवेकानंद चे पोलिस अमलदार आनंद हल्लाळे, रणवीर देशमुख यांनी केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने