• Story 1
  • Story 2
  • Story 3
  • Story 4
  • Story 5

लातूर ग्रामीण चे लोकप्रिय आमदार रमेशआप्पा कराड यांच्या प्रयत्नातून बंद पडलेले लातूर कळंब रस्त्याचे काम पुन्हा सुरू


आ. रमेशआप्पा कराड यांच्या प्रयत्नातून 
बंद पडलेले लातूर कळंब रस्त्याचे काम पुन्हा सुरू
लातूर दि.०8- लातूर ते कळंब रस्त्याचे काम गेल्या काही दिवसापासून बंद असल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याने लातूर ग्रामीणचे आमदार रमेशआप्पा कराड यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सदरील काम तातडीने सुरू करण्याबाबतच्या सूचना दिल्याने पुन्हा या रस्त्याच्या कामाला सुरुवात झाल्याने नागरिकांत समाधान व्यक्त केले जात आहे.
        केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री माननीय नितीनजी गडकरी साहेब यांच्याकडे वेळोवेळी पाठपुरावा करून भाजपाचे नेते आ. रमेशआप्पा कराड यांनी लातूर ते कळंब या रस्त्याच्या कामाला मंजुरी मिळून घेतली होती. सदरच्या रस्त्याचे कामही सुरू झाले होते मात्र गेल्या काही दिवसापासून रस्त्याचे काम बंद पडल्याने सर्व प्रकारच्या वाहन चालकासह नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. 
      जनतेची होणारी गैरसोय लक्षात घेऊन लातूर ग्रामीणचे आमदार रमेशआप्पा कराड यांनी आठ दिवसापूर्वी संभाजीनगर येथील मुख्य अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग कातकडे यांना मागील अनेक दिवसापासून बंद पडलेल्या लातूर - कळंब रस्त्याचे काम पुन्हा तात्काळ सुरू करण्याची सूचना केली होती. आ. कराड यांच्या सूचनेची आणि जनतेच्या होणाऱ्या गैरसोयीची दखल घेऊन लातूर रेल्वे गेट ते जुनी एमआयडीसी दरम्यानच्या रस्त्याचे डांबरीकरण काम सुरू झाले आहे. 
 लातूर - कळंब रस्त्याच्या कामाला सुरुवात झाल्याने अनेक गावच्या नागरिकासह वाहनचालकांना मोठा दिलासा मिळणार आहे. बंद पडलेले काम पुन्हा सुरू करण्यासाठी प्रयत्न केल्याबद्दल लातूर ग्रामीणचे आमदार रमेशआप्पा कराड यांचे भाजपा कार्यकर्त्यांसह नागरिकांनी आभार व्यक्त केले आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने