• Story 1
  • Story 2
  • Story 3
  • Story 4
  • Story 5

विलासराव देशमुख मार्गावरील भाजी व फळ विक्रेते यांना व्यवसायाकरिता पर्यायी जागा उपलब्ध करून द्यावी:-लातूर शहर जिल्हा काँग्रेसची मनपा आयुक्ताकडे निवेदनाद्वारे मागणी.

विलासराव देशमुख मार्गावरील भाजी व फळ विक्रेते यांना व्यवसायाकरिता पर्यायी जागा उपलब्ध करून द्यावी
   
लातूर शहर जिल्हा काँग्रेसची मनपा आयुक्ताकडे निवेदनाद्वारे मागणी
लातूर प्रतिनिधी:
लातूर शहरातील दयानंद महाविद्यालयाच्या लगत असलेल्या विलासराव देशमुख मार्गावर मागील बऱ्याच वर्षापासून किरकोळ भाजी व फळ विक्रेते हे त्यांचा व्यवसाय करून त्यांची व त्यांच्या कुटुंबाची उपजीविका भागवतात.मागील पंधरा दिवसांपूर्वी लातूर शहर महानगरपालिका प्रशासनाने कारवाई करून या सर्व फळ व भाजी विक्रेत्यांना त्या ठिकाणावरून काढले आहे.या सर्व भाजी व फळ विक्रेते यांना व्यवसायाकरिता पर्यायी जागा उपलब्ध करून द्यावी.अशी मागणी मंगळवार दि.२८ जानेवारी रोजी लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीने लातूर शहर महानगरपालिकेच्या आयुक्ताकडे निवेदनाद्वारे केली आहे.  

किरकोळ भाजी व फळ विक्रेते यांना महानगरपालिका प्रशासनाने या व्यवसायासाठी रीतसर परवाने सुध्दा दिलेले आहेत.वास्तविक या व्यावसायिकांना ते व्यवसाय करत असलेल्या ठिकाणाहून काढण्यापूर्वी त्यांना त्यांच्या व्यवसायाकरिता पर्यायी जागा उपलब्ध करुन देणे गरजेचे होते परंतु या व्यवसायिकांना कोणताही पर्याय न देता त्यांच्यावर कारवाई करण्यात आली.या व्यवसायिकांचा उदरनिर्वाह हा त्यांच्या फळ व भाजी विक्री करण्याच्या व्यवसायावरच अवलंबून असून मागील पंधरा दिवसापासून त्यांचा व्यवसाय बंद आहे.सध्या या व्यवसायिकांवर उपासमारीची वेळ आलेली आहे तसेच बार्शी रोड परिसरातील नागरिकांना सुध्दा रोज आवश्यक असणारा भाजीपाला खरेदी करण्याकरिता अडचणीचा सामना करावा लागत आहे.यावेळी भाजीपाला व फळ व्यावसायिक यांना लकवकरच पर्यायी जागा उपलब्ध करून देण्यात येईल अशी अशी अपेक्षा यावेळी काँग्रेस पक्षाच्या शिष्टमंडळाने व्यक्त केली.


याप्रसंगी लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष ऍड किरण जाधव,इमरान सय्यद,आयुब मणियार,प्रा.प्रवीण कांबळे, प्रवीण सूर्यवंशी, गोटू यादव, दत्ता सोमवंशी, आसिफ बागवान, गौस गोलंदाज,खाजा शेख, सायरा पठाण,सिद्धार्थ सूर्यवंशी आदीसह काँग्रेस पक्षाचे विविध पदाधिकारी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने