• Story 1
  • Story 2
  • Story 3
  • Story 4
  • Story 5

लातूर एमआयटी येथे उत्साहात प्रजासत्ताक दिन वैद्यकीय विविध गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव

लातूर एमआयटी येथे उत्साहात प्रजासत्ताक दिन
वैद्यकीय विविध गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव
 लातूर दि. २७ - भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने माईर्सच्‍या एमआयटी वैद्यकीय शैक्षणीक संकुल, लातूर येथे गुरुवार दि. २६ जानेवारी २०२५ रोजी सकाळी ९.२० वाजता लातूर एमआयटी वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठता डॉ. एन. पी. जमादार यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले. याप्रसंगी विविध पुरस्कार वितरणासह वैद्यकीय गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करून गौरव करण्यात आला.
  प्रारंभी राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांच्या प्रतिमेस  पुष्पहार अर्पण करून वैद्यकीय महाविद्यालयाचे आधिष्ठता डॉ. एन. पी. जमादार यांनी अभिवादन केले. याप्रसंगी लातूर एमआयटीचे उपअधिष्‍ठाता डॉ. बी.एस. नागोबा, परिसर विकास समन्‍वयक पृथ्‍वीराज कराड, मानव संसाधन विकास प्रमुख ऋषिकेश कराड, शैक्षणिक संचालक डॉ. चंद्रकांत शिरोळे, प्रशासकीय संचालिक डॉ. सरिता मंत्री यांच्‍यासह सर्व विभाग प्रमुख, अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी-विद्यार्थीनी मोठया संख्‍येने उपस्थित होते. वैद्यकीय शिक्षण द्वितीय वर्षाच्या परीक्षेत महाविद्यालयातून सर्वप्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यास कै. मोनिका ढाका हा पुरस्‍कार यावर्षी विभागून स्‍नेहल सुखदेव फड व विवेक भारतराव क्षिरसागर यांना तर कै. जणाबाई ग्‍यानोबा शेप हा पुरस्‍कार प्रथम वर्षाच्या परीक्षेत महाविद्यालयातून सर्वप्रथम येणाऱ्या अमृता भास्‍कर हंगरगे या विद्यार्थ्‍यांना मान्‍यवर प्रमुखांच्‍या हस्‍ते देण्‍यात आला. 
लातूर एमआयटी वैद्यकीय महाविद्यालयातील विविध विषयात प्राविण्‍यासह उतीर्ण झालेले सोळंके श्रीकांत, आल्‍टे किरण, कलाले अदित्‍य, सुर्यवंशी समिक्षा, वांगस्‍कर श्रेयस, दरक शुभम, मार्गेपवार श्रावणी, शिंदे साक्षी, भेरे साक्षी, भांबरे आदित्‍य, बोडके वैशाली, बुरांडे प्राजक्‍ता, चाऊस नवेद, देवरे प्रतिक, रंदाळे कार्तीक, खामगावकर मिनाक्षी, मुंडे तेजल, निखाडे कोमल, सुशांत शहाने, शेख मोहंमद, शेख सायमा, शिंपी मृनाल, यादव जितेंद्र, वाडसकर रुचिता, कराड प्रथमेश, शिंदे सौरभ, जोशी अखिलेश, पाटील समृध्‍दी, नागठाने मधुर, पाटील पारस, माने अक्षता, पाटणकर अक्षय, मल्‍होत्रा प्रियंका, शेट्टी आकाश या पदवी व पदव्‍युत्‍तर  विद्यार्थ्‍याचा यथोचित सत्‍कार करुन गौरव करण्‍यात आला.  
        याप्रसंगी वैद्यकीय महाविद्यालयातील नर्सींग महाविद्यालयाचे प्राचार्य सरवनन, दंत महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. यतीश जोशी, डॉ. अमोल डोईफोडे, फार्मासी कॉलचे प्राचार्य होगाडे] डॉ चंद्रकला पाटील, डॉ अरुणकुमार राव, डॉ विद्या कांदे, डॉ मुकुंद भिसे, डाँ. एस. एन. कुलकर्णी, डॉ आशा पिचारे, डॉ. फिरोज पठाण, डॉ. एन व्ही कुलकर्णी, डॉ गजानन गोंधळी, डॉ शैला बांगड, डॉ मालू, डॉ कारंडे रुग्णालय प्रशासकीय अधिकारी श्रीपती मुंडे, यांच्यासह एमआयएमएसआर वैद्यकीय महाविद्यालय व यशवंतराव चव्हाण ग्रामीण रुग्णालय, एमआयडीएसआर दंत महाविद्यालय, फिजीओथेरपी महाविद्यालय व नर्सिंग महाविद्यालयातील विभाग प्रमुख, प्राध्यापक, डॉक्टर, विद्यार्थी, पालक व नागरीक ध्वजारोहन कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने