• Story 1
  • Story 2
  • Story 3
  • Story 4
  • Story 5

सौ. संजीवनीताई रमेशअप्पा कराड यांच्याकडून रेणापूर येथे कातळे परिवाराचे सांत्वन

सौ. संजीवनीताई रमेशअप्पा कराड यांच्याकडून रेणापूर येथे कातळे परिवाराचे सांत्वन
 
लातूर दि.३१- जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या प्रा. अर्चनाताई कातळे यांचे पिताश्री भाजपाचे ज्येष्ठ नेते रेणापूर सेवा सहकारी सोसायटीचे माजी चेअरमन तथा रेणापूर ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच अँड. रंगनाथरावजी कातळे यांचे नुकतेच दुःखद निधन झाल्याने भाजपाच्या सौ. संजीवनीताई रमेशआप्पा कराड यांनी सोमवारी रेणापूर येथील त्यांच्या निवासस्थानी जाऊन कातळे परिवाराचे सांत्वन केले.
          लोकनेते स्व. गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्या सोबत अनेक वर्ष काम केलेले भारतीय जनता पार्टीचे जेष्ठ नेते अँड. रंगनाथराव कातळे हे गेल्या काही दिवसापासून आजारी होते. गुरुवारी पहाटे त्यांचे दुःखद निधन झाले. सौ संजीवनीताई रमेशआप्पा कराड यांनी सोमवारी रेणापूर येथील त्यांच्या निवासस्थानी जाऊन कातळे परिवाराचे सांत्वन केले. यावेळी स्व. कातळे यांचे लहान बंधू रावसाहेब कातळे, मुली रंजना शेंडगे, संगीता कापसे, सिंधू गाडे, मंजुषा आपेट आणि अर्चना कातळे-टेंगसे, त्याचबरोबर पार्वतीताई सोमवंशी, चंद्रकांत कातळे यांच्यासह भाजपाचे दत्ता सरवदे, महेश गाडे, उतम चव्हाण, संतोष आपेट व इतर अनेक जण उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने