• Story 1
  • Story 2
  • Story 3
  • Story 4
  • Story 5

जिल्ह्यातील सोयाबीन खरेदीचे उद्दिष्ट वाढवून खरेदीची मुदत वाढवावी आ. कराड यांची मागणी

जिल्ह्यातील सोयाबीन खरेदीचे उद्दिष्ट वाढवून 
खरेदीची मुदत वाढवावी आ. कराड यांची मागणी

लातूर दि.२९ - शेतकऱ्यांना दिलासा देता यावा यासाठी हंगाम २०२४२५ करिता केंद्र शासनाने निश्चित केलेल्या आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत नाफेड तर्फे चार एजन्सी मार्फत लातूर जिल्ह्यात सोयाबीन खरेदीचे काम सुरू झाले. आतापर्यंत १२ लाख ८४ हजार सोयाबीन ची खरेदी झाली असून ६३ हजार शेतकऱ्यांचे सोयाबीन खरेदी करणे बाकी आहे बहुतांशी शेतकऱ्यांचे सोयाबीन घरीच असल्याने दहा लाख क्विंटल सोयाबीन खरेदीचे उद्दिष्ट वाढवून सोयाबीन खरेदीची मुदत वाढवून द्यावी अशी मागणी भाजपाचे नेते आ. रमेशआप्पा कराड यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि राज्याचे पणन मंत्री जयकुमारजी रावल यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
         लातूर जिल्हा सोयाबीन उत्पादक जिल्हा असून जिल्ह्यातील बहुतांशी शेतकरी सोयाबीनचे पीक मोठ्या प्रमाणात घेतात या सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देता यावा याकरिता राज्यातील महायुती शासनाने निश्चित केलेल्या आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत नाफेड मार्फत सोयाबीन खरेदीचे काम सुरू केले आतापर्यंत जिल्ह्यातील १ लाख १५ हजार शेतकऱ्यांनी सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी केली असून त्यापैकी ५२ हजार शेतकऱ्यांचे १२ लाख ८४ हजार १७२ क्विंटल सोयाबीनची खरेदी झालेली आहे नोंदणी झालेल्या ६३ हजार २९१ शेतकऱ्याची सोयाबीन खरेदी होणे बाकी असून खरेदीची मुदत ३१ जानेवारी २०२५ पर्यंतच आहे असे दिलेल्या निवेदनात नमूद करून आ. रमेशआप्पा कराड म्हणाले की, बहुतांशी शेतकऱ्याचे सोयाबीन मोठ्या प्रमाणात शिल्लक असल्याने लातूर जिल्ह्यातील सोयाबीन खरेदी योजनेचे उद्दिष्ट वाढवण्याबरोबरच खरेदी योजनेला मुदतवाढ देणे गरजेचे आहे. 
        यावर्षी लातूर जिल्ह्यात अंदाजे ९९ लाख क्विंटल इतके सोयाबीन उत्पादित झाले असून आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत यापैकी २५ टक्के म्हणजे २५ लाख क्विंटल सोयाबीन खरेदी करणे आवश्यक आहे. त्यानुसार आत्तापर्यंत १२ लाख ८४ हजार क्विंटल सोयाबीनचे खरेदी झाली असून आणखी १२ लाख क्विंटल सोयाबीन खरेदी होणे आवश्यक आहे. लातूर जिल्ह्याला देण्यात आलेले उद्दिष्ट जवळपास पूर्ण झाले असून शेतकऱ्याकडे असलेले सोयाबीन लक्षात घेता नोंदणी केलेल्या सर्व शेतकऱ्यांचे सोयाबीन खरेदी करण्यासाठी आणखी १० लाख क्विंटल सोयाबीन खरेदीला मान्यता आणि मुदतवाढ शासनाने देऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी ही मागणी भाजपाचे नेते आ. रमेशआप्पा कराड यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि राज्याचे पणन मंत्री जयकुमारजी रावल यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने