• Story 1
  • Story 2
  • Story 3
  • Story 4
  • Story 5

संत गोपाळबुवा महाराज साखर कारखान्याचा बॉयलर अग्नी प्रदीपन सोहळा४ फेब्रुवारी रोजी होणार संपन्न.

संत गोपाळबुवा महाराज साखर कारखान्याचा 
४ फेब्रुवारी रोजी बॉयलर अग्नी प्रदीपन सोहळा
 लातूर दि.०१ - लातूर तालुक्यातील दिंडेगाव रोडवर मौजे रामेश्वर परिसरात शेतकऱ्यांच्या हिताची जपणूक करण्यासाठी उभा राहत असलेल्या संत श्री गोपाळबुवा महाराज शुगर अँन्ड ॲग्रो फुड इंडस्ट्रीज प्रा. लि. रामेश्वर या साखर कारखान्याचा बॉयलर अग्नी प्रदीपन सोहळा मंगळवार ४ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी १० वाजता अध्यात्मिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांच्या शुभ हस्ते करण्यात येणार असून या कार्यक्रमास कारखाना कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक शेतकऱ्यासह भागधारकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन कारखान्याची चेअरमन राजेश कराड यांनी केले आहे. 
         लातूर ग्रामीण मतदार संघातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या मागणीनुसार रामेश्वर परिसरात संत श्री गोपाळबुवा महाराज शुगर अँन्ड ॲग्रो फुड इंडस्ट्रीज प्रा. लि. रामेश्वर या साखर कारखान्याची उभारणी करण्यात आली असून या कारखान्याचा रोलर पूजनचा कार्यक्रम गेल्या १२ नोव्हेंबर रोजी परिसरातील हजारो शेतकऱ्यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहाच्या आणि स्वप्नपूर्तीच्या वातावरणात संपन्न झाला. 
          चालू हंगामात साखर कारखान्याचे गाळप सुरू व्हावे या दृष्टीने विविध अडचणीवर मात करत युद्धपातळीवर कारखान्याच्या उभारणीचे काम सुरू झाले असल्याचे सांगून चेअरमन राजेश कराड यांनी उभारणीस उशीर झाला असला तरी चालू गळीत हंगामाच्या अंतिम टप्प्यात प्रत्यक्ष गाळपाला सुरुवात होणार आहे. त्यानुसार येत्या ४ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी १० वाजता कारखान्याचा बॉयलर अग्नी प्रदीपन सोहळा अध्यात्मिक क्षेत्रातील परमपूज्य विद्यानंद सागर महाराज गातेगाव, हभप नारायण महाराज उत्तरेश्वर पिंपरी, हभप लालासाहेब नाना पवार, हभप बाबा महाराज बोराडे आणि जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष नाथसिंह देशमुख यांच्यासह अनेक मान्यवरांच्या शुभहस्ते आयोजित करण्यात आला आहे.
          श्री संत गोपाळ बुवा महाराज शुगर इंडस्ट्रीज या साखर कारखान्याच्या बॉयलर अग्नी प्रदीपन सोहळ्यास कारखाना कार्यक्षेत्रातील सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आणि कारखान्याच्या भागधारकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन कारखान्याचे मुख्य प्रवर्तक तुळशीराम अण्णा कराड आणि राजेश कराड यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने