• Story 1
  • Story 2
  • Story 3
  • Story 4
  • Story 5

थकबाकीदाराच्या प्रॉपर्टीचा ताबा त्वरीत देण्याची जिल्हाधिकारी यांना बँक असोसिएशनची मागणी

थकबाकीदाराच्या प्रॉपर्टीचा ताबा त्वरीत देण्याची जिल्हाधिकारी यांना बँक असोसिएशनची मागणी
लातूर - केंद्र शासनाच्या नविन नियमावली प्रमाणे बँकेच्या थकबाकीदाराची वसुली कायद्याप्रमाणे करण्यासाठी मा. डी.डी.आर. मा. जिल्हाधिकारी यांच्या मान्यतेनंतर कलम सहकारी १०१ व सरफेसी अ‍ॅक्टची अंमलबजावणी मा. तहसिलदार, मंडळ अधिकारी यांना थकबाकीदारांच्या मालमत्‍ता ताबा देण्याचे आदेश देतात त्या प्रमाणे बँकेला ताबा देण्याची त्यांची जबाबदारी आहे. त्यासाठी थकबाकीदार व खातेदारांनी उपस्थित रहावे अशी कायद्यात तरतूद नाही असे असतानाही तहसिलदार व मंडळ अधिकारी याची अंमलबजावणी करत नाहीत. त्यांच्यावर कार्यवाही करावी, अशी मागणी बँक असोसिएशनच्यावतीने करण्यात आली.
       तसेच डी.डी.आर यांनी निर्णय दिल्यानंतर ताब्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयात प्रस्ताव दाखल केल्यानंतर त्याची पाहणी करून एक महिण्याच्या आत निर्णय घ्यावा असे आदेश मुंबई उच्च न्यायालय यांनी जिल्हाधिकारी सांगली यांना सारस्वत बँकेसंदर्भात दिलेले आहेत. या प्रमाणे कार्यवाही करून लातूर जिल्हा नागरी सहकारी बँकाना सहकार्य करावे अशी मागणी या निवेदनाद्वारे लातूर जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशन तर्फे मा. जिल्हाधिकारी, लातूर यांना करण्यात आली.
     यावेळी महाराष्ट्र नागरी सह. बँक लि. लातूरचे संस्थापक अध्यक्ष माजी आ. शिवाजीराव पाटील कव्हेकर, यशवंत नागरी सहकारी बँक लि. लातूरचे चेअरमन सुहास बा. पाचपुते, साईबाबा नागरी सह बँक लि. लातूर चे चेअरमन जब्बार पटेल, लातूर अर्बन कॉ ऑप बँकेचे संचालक अ‍ॅड. जी. एस. बादाडे यांच्यासह असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने