• Story 1
  • Story 2
  • Story 3
  • Story 4
  • Story 5

श्री सिध्देखर व रत्नेश्वर महाशिवरात्री यात्रा महोत्सव 26 फेब्रुवारीपासून सुरु.

श्री सिध्देखर व रत्नेश्वर महाशिवरात्री यात्रा महोत्सव 26 फेब्रुवारीपासून सुरु.

लातूर दिनांक 25 फेब्रुवारी लातूर नगरीचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर रत्नेश्वर यात्रा महोत्सव प्रति वर्षाप्रमाणे याही वर्षी संपन्न होत असून हा यात्रेचा महापर्वकाळ बुधवार दि २६ फेब्रुवारी २०२५ ते सोमवार दि १७ मार्च २०२५ पर्यंत आहे.

दि. २६ फेब्रुवारी २०२५ रोजी जिल्हाधिकारी यांच्या हस्ते सकाळी १०.०० वा. विधीवत पुजा करुन झंडा वंदनाने महाशिवरात्री यात्रा महोत्सवास प्रारंभ होईल. दुपारी २.०० वाजता गौरी शंकर मंदिर, मार्केट यार्ड येथुन श्री च्या झेंड्याची भव्य मिरवणुक पशु प्रदर्शन, अश्व व डॉग शो, १००१ महिलांच्या वतीने श्री चा महारुद्राभिषेक बुधवार ०२ मार्च रोजी सांय ६ ते ८ वा ह.भ.प. गुरुवर्य श्री गुरुबाबा महाराज औसेकर यांचे चक्रिभजन रविवार १६ मार्च रोजी दुपारी ०३.०० वा जंगी कुस्ती स्पर्धा सोमवार १७ मार्च रोजी रात्री ८.०० वा शोभेची दारु उडवुण आतषबाजीने यात्रा महोत्सवाची सांगता करण्यात येणार असल्याचे विनित : श्री. सचिन सु. जांबुतकर प्रशासक श्री सिद्धेश्वर व रत्नेश्वर देवालय, लातूर तथा धर्मादाय निरीक्षक, लातूर व समस्त विश्वस्त मंडळ भाविक यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने