आज दिनांक 27 फेब्रुवारी 2025 रोजी शिवसेना जिल्हाप्रमुख शिवाजीराव माने यांच्या नेतृत्वाखाली लातूर जिल्ह्यामध्ये शिवसेना जिल्हा संपर्क कार्यालय लातूर येथे संजय राऊत यांनी नीलम ताई गोऱ्हे यांच्या बद्दल अपशब्द वापरले होते .त्याबद्दल शिवसेनेच्या वतीने जिल्हाप्रमुख शिवाजीराव माने यांच्या नेतृत्वाखाली आज जोडे आंदोलन घेण्यात आले.
*मारतोय गांजा आणि बरळतोय संज्या*
*या संज्याचं करायचं काय खाली मुंडक वरी पाय*
*मुर्दाबाद मुर्दाबाद संजय राऊत मुर्दाबाद**अशा घोषणा देऊन
उबाठा प्रवक्ता संजय राऊत याच्या प्रतिमेस जोडे मारण्यात आले.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख शिवाजी माने म्हणाले की आमच्या नेत्या विधान परिषदेच्या उपसभापती सौ नीलम ताई गोऱ्हे यांनी उबाठा गटावर केलेला आरोप संजय राऊत यांच्या नाकाला मिरची लागल्यासारखा झोंबला. आणि हा संजय राऊत गांजा मारून बरळला आदरणीय ताई बद्दल खालच्या पातळीवर जाऊन अपशब्द वापरला खरंतर हा नालायक माणूस महिला बद्दल किती खालची पायरी गाठू शकतो हे याच्या विधानावरून स्पष्ट होत आहे. म्हणून आज आम्ही आदरणीय नीलम ताई गोरे यांच्या बद्दल अपशब्द वापरलेल्या संजय राऊतला जाहीर आव्हान करतोय खबरदार महाराष्ट्रातल्या मायमाऊलीच्या वर खालच्या भाषेत जाऊन चिखल फेक करत असाल तर तुम्हाला याहीपेक्षा वेगळ्या भाषेतील वेगळ्या पद्धतीने उत्तर देण्याचे क्षमता महाराष्ट्रातल्या तमाम शिवसैनिकांमध्ये आहे. वेळ प्रसंग पडल्यास हा शिवसैनिक त्याच ठिकाणी तुम्हाला त्याच पद्धतीने उत्तर देऊन धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही.
या आंदोलनाला युवा सेना जिल्हाप्रमुख युवराज वंजारे, तानाजी सुरवसे औसा तालुकाप्रमुख ,युवती सेना जिल्हाप्रमुख अल्पना ताई वाघमारे, रोहित जाधव वाहतूक सेना जिल्हाप्रमुख, महिला आघाडी तालुकाप्रमुख विधीज्ञ सौ. वर्षाताई शिंदे, गणेश शिंदे, पुष्पाताई तोंडारे, नीता शिराळकर, महावीर चव्हाण, शंकर गंगणे, सुरज गायकवाड, ज्ञानेश्वर रेड्डी, अमर गवळी, शंतनू माने ,हिरा चव्हाण, आत्माराम तुंडारे ,श्रावण लड्डा, असे अनेक शिवसैनिक उपस्थित होते.
Tags
The महाराष्ट्र News