• Story 1
  • Story 2
  • Story 3
  • Story 4
  • Story 5

मांजरा प्रकल्पाच्या उजवा कालव्यात पाणी सोडण्याची आ. रमेशअप्‍पा कराड यांची सुचना

मांजरा प्रकल्पाच्या उजवा कालव्यात पाणी सोडण्याची आ. रमेशअप्‍पा कराड यांची सुचना
        
लातूर दि.०२- लातूर ग्रामीण मतदार संघातून मांजरा प्रकल्पाचा उजवा कालवा जात असून तातडीने येत्या चार ते पाच दिवसात मांजरा प्रकल्प उजव्या कालव्यास पाणी सोडून शेतकऱ्यांना पाणी उपलब्ध करून देण्यात यावे अशी सूचना भाजपाचे नेते आ. रमेशआप्पा कराड यांनी संबंधित अधिकाऱ्यांना केली आहे. 
          लातूर ग्रामीण मतदार संघातून मांजरा प्रकल्पाचा उजवा आणि डावा कालवा जात आहे या दोन्ही कालव्यामुळे मतदार संघातील अनेक गावच्या जमिनी सिंचनाखाली येतात. जेव्हा जेव्हा मांजरा प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला जातो त्यावर्षी या कालव्यांना पाणी सोडून जमिनी ओलिताखाली आणण्यासाठी शेतकऱ्यांना मदत केली जाते.
         मागील काळात मांजरा प्रकल्पाच्या डाव्या कालव्याला काही प्रमाणात पाणी सोडण्यात आले होते. कालवा सल्लागार समितीमध्ये मांजरा प्रकल्प उजवा कालव्याची पाणी आवर्तने मंजूर करण्यात आली आहेत, तथापि परतीचा पाऊस जास्त झाल्यामुळे रब्बी पिकांकरिता शेतकऱ्याकडून जास्त पाण्याची मागणी नव्हती. मात्र आता पिकांना पाण्याची आवश्यकता भासत असल्यामुळे कालव्याद्वारे पाणी सोडण्याची मागणी कालवा काठच्या विविध गावातील संबंधित शेतकऱ्याकडून होत आहे.
 शेतकऱ्याची गरज लक्षात घेऊन तातडीने येत्या चार ते पाच दिवसात मांजरा प्रकल्प उजव्या कालव्यास पाणी सोडून शेतकऱ्यांना पाणी उपलब्ध करून देण्यात यावे अशी सूचना अधीक्षक अभियंता व प्रशासक, लाभक्षेत्र विकास प्राधीकरण, लातूर यांना भाजपाचे नेते तथा लातूर ग्रामीणचे आमदार श्री. रमेशआप्पा कराड यांनी दिली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने