*लातूर जिल्ह्यातील औसा निलंगा देवणी व शिरूर अनंतपाळ तालुक्यातील उपजिल्हाप्रमुख तालुकाप्रमुख युवा सेना महिला आघाडी मागासवर्गीय सेना राष्ट्रीय कर्मचारी सेना अंगीकृत संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांना सूचित करण्यात येते की उद्या दिनांक 05 मार्च 2025 रोजी सकाळी दहा वाजून तीस मिनिटांनी औसा तालुक्यातील लामजना पाटी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये शिवसेना सचिव सन्माननीय मोरे साहेब शिवसेना मराठवाडा संपर्कप्रमुख सन्माननीय आनंदराव जाधव साहेब शिवसेना लोकसभा प्रमुख श्रीमान बालाजीराव काकडे साहेब शिवसेना महिला आघाडीच्या संपर्कप्रमुख सौभाग्यवती रंजनाताई कुलकर्णी व लातूर जिल्हा संपर्कप्रमुख विधीज्ञ बळवंतराव जाधव साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच कैलासवासी संतोष देशमुख यांच्या निर्घुण हत्येतील क्रूरकर्मा मुख्य सूत्रधार वाल्मीक कराड व त्यांचे सर्व साथीदार त्यांची केस अति जलद गतीने चालणाऱ्या कोर्टामध्ये चालवून लवकरात लवकर फाशी देण्यात यावी* *यासाठी तीव्र आंदोलन करण्यात येणार आहे तरी वरील तालुक्यातील सर्व प्रमुख पदाधिकारी महिला आघाडी युवा सेना सर्व शिवसैनिक शिवसेना प्रेमी यांनी लामजना पाटी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये अगदी वेळेवर* *उपस्थित रहावे*.
*जय महाराष्ट्र*
*आपला*
*शिवाजी माधवराव माने*
*शिवसेना जिल्हाप्रमुख लातूर*
Tags
The महाराष्ट्र News