आज बीड जिल्ह्यातील मसाजोग गावचे सरपंच कैलासवासी संतोष देशमुख यांच्या हत्याकांडातील मारेकऱ्यांना लवकरात लवकर कठोर शिक्षा देऊन फासावर लटकावे यासाठी संपूर्ण महाराष्ट्राचा आराध्य दैवत शिवछत्रपती शिवाजी महाराज चौक लामजना पाटी या ठिकाणी लातूर जिल्ह्याचे जिल्हाप्रमुख श्रीमान शिवाजीराव माने साहेब यांच्या नेतृत्वामध्ये शिवसेना लातूर जिल्ह्याच्या वतीने तीव्र असे आंदोलन करण्यात आले
खरोखरच बीड जिल्ह्यात मसाजोग गावामध्ये 9 डिसेंबर ते 13 डिसेंबर कालावधीमध्ये अतिशय हृदय द्रावक हृदय द्रावक मनाला पिळून टाकणारे क्रूर असं हत्याकांड घडवलं गेलं त्या हत्याकांडाचा मुख्य सूत्रधार वाल्मीक कराड व त्याच्या टोळीतील सर्वच गुन्हेगारांना न्यायालयाच्या फास्टट्रॅक कोर्टामध्ये प्रकरण चालवून भर चौकात त्यांना फाशी द्यावी व याच प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळे याला तात्काळ अटक करून त्याला फासावर लटकवावे या मागणीसाठी लातूर जिल्ह्याच्या वतीने शिवसेना जिल्हाप्रमुख श्री शिवाजीराव माने साहेब यांच्या नेतृत्वामध्ये शिवछत्रपती शिवाजी महाराज चौक लामजना पाटील या ठिकाणी तीव्र असे आंदोलन करण्यात आले निषेध व्यक्त करण्यात आला वाल्या कराडचा प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारून भर चौकात फासावर लटकवण्यात आले मसाजोग येथील सरपंच कैलासवासी संतोष देशमुख यांची निर्गुण हत्या करण्यात आली अशी निर्गुण हत्या महाराष्ट्राच्या राजकारणात आतापर्यंत कधीही घडली नाही महाराष्ट्राच्या प्रतिमेला काळीमा फासणारी घटना असून राजकारणात कुणाचं तरी गट बसवण्यासाठी हुकमी एका बनवण्यासाठी अशा गुंड प्रवृत्तीचा वापर करून वाल्मीक कराड व त्याच्या सर्व साथीदाराने अनेक खून दरोडे बलात्कार असे गुन्हे केलेले आहेत योग्य प्रकारची चौकशी होऊन तात्काळ यांचा अतिजलद कोर्टामध्ये खटला चालवून लवकरात लवकर या सर्व आरोपींना फासावर लटकवण्यात यावे जेणेकरून हे महाराष्ट्र राज्य कायद्याचा आहे इथे कायद्यास सर्व समोर सर्व समान आहेत हा निरोप संपूर्ण महाराष्ट्राला जाईल अन्यथा सत्तेचा वापर पदाचा दुरुपयोग गुंड पाडून दहशत निर्माण करून राजकारणात आपली पोळी भाजून घेणारे व जनतेला भेटीस धरणारे खून करणारे खंडणीखोर दरोडे टाकणारे हे भविष्यकाळात यापेक्षाही अतिशय घातक कृत्य करतील आणि महाराष्ट्र छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महाराष्ट्रा त छत्रपती शिवाजी महाराजांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असणारे घटना घेऊन चालणारा महाराष्ट्र साधुसंताचा महाराष्ट्र लोकशाही जिवंत ठेवून चालणारा महाराष्ट्र बदनाम होईल यासाठी बीड जिल्हा मस्सा जोग येथील सरपंच कैलासवासी संतोष देशमुख यांचे मारेकरी व त्यांना मदत करणारे त्यांना वाचवणारे या सर्व आरोपी व आजही ताब्यात नसलेला याच हत्याकांडातील एक प्रमुख आरोपी कृष्णा आंधळे याला तात्काळ अटक करून वाल्मीक कराड सह या सर्वांना भर चौकात फाशी देण्यात यावी आणि कैलासवासी सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळवून देण्यासाठी शिवसेना लातूर जिल्ह्याच्या वतीने शिवछत्रपती शिवाजी महाराज या ठिकाणी तीव्र अशा स्वरूपाचे आंदोलन करून वाल्मीक कराड यांच्या प्रतिघात पुतळ्याला फासावर लटकून जोडी मारून आंदोलन करण्यात आले या प्रसंग उपस्थित शिवसेना जिल्हाप्रमुख श्री शिवाजीराव माने,साहेब महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख सौ.अर्चनाताई बिरादार,शिवसेना उपजिल्हाप्रमुख विनोदांना आर्य,उपजिल्हाप्रमुख सुधीर पाटील,शिवसेना तालुकाप्रमुख तानाजी सुरवसे,औसा शहर प्रमुख बंडूभाऊ कोद्रे,शिवसेना तालुकाप्रमुख विकास शिंदे शिवसेना तालुकाप्रमुख भगवान जाधव, शिवसेना तालुकाप्रमुख धनराज बिराजदार,युवा सेना उपजिल्हाप्रमुख प्रसाद भोसले,ज्येष्ठ शिवसैनिक दत्ताजी भोसले,महिला आघाडीच्या तालुकाप्रमुख एडवोकेट सौ. वर्षाताई शिंदे,निलंगा शहर प्रमुख मुस्तफा शेख, यशवंत ठाकरे, युवा सेना तालुका प्रमुख शैलेश बाजुळगे, रामेश्वर मुळे,बाळासाहेब मुळे, तुळशीराम सुरवसे,आदिसह शिवसैनिक व सामाज बांधव मोठया संख्येने उपस्थित होते.
Tags
The महाराष्ट्र News