शिवसेना जिल्हाप्रमुख शिवाजीराव माने साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये अनेक कार्यक्रम संपन्न .राष्ट्रीय कर्मचारी सेना लातूर विभागीय कार्यकारणी सन 2025, लातूर विभाग नियंत्रक श्री जानराव साहेब यांना सुपूर्द, संघटना फलकाचे अनावरण, विविध संघटनात्मक कामकाजाची सुरुवात
आज दिनांक 06 मार्च 2025 रोजी शिवसेनेचे मुख्य नेते महाराष्ट्र राज्याचे सर्वांचे आवडते उपमुख्यमंत्री माननीय नामदार एकनाथरावजी शिंदे, महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री *माननीय नामदार प्रताप जी सरनाईक यांच्या आदेशाने तसेच राष्ट्रीय कर्मचारी सेना संघटना अध्यक्ष किरण पावसकर, लातूर शिवसेना जिल्हा प्रमुख शिवाजीराव माने यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली, राष्ट्रीय कर्मचारी सेना लातूर विभाग सन 2025 कार्यकारणी , लातूर विभागाचे सर्वांचे लाडके विभाग नियंत्रक जानराव यांना देण्यात आली तसेच लातूर शिवसेना जिल्हाप्रमुख श्री शिवाजीराव माने यांनी लातूर विभागाचे विभाग नियंत्रक श्री जानराव साहेब यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला
या कार्यक्रमास लातूर शिवसेना जिल्हाप्रमुख शिवाजीराव माने , लातूर शिवसेना वाहतूक जिल्हाध्यक्ष रोहित जाधव , राष्ट्रीय कर्मचारी सेना केंद्रीय कार्यकारणी सदस्य व्यंकटराव बिरादार विभागीय अध्यक्ष
सतीश पवार, विभागीय सचिव केंद्र हर्षद, विभाग कार्याध्यक्ष उमेश मोरे, विभाग कोषाध्यक्ष शरद पवार, विभागीय संघटक सचिव प्रदीप गुरव,निलंगा आगार अध्यक्ष संतोष भिंगोले, निलंगा आगार सचिव विष्णू नाईकवाडे, औसा आगार अध्यक्ष
सचिन हवालदार, विभागीय कार्यालय अध्यक्ष ज्ञानेश्वर जाधव, विभागीय विधी सल्लागार आबासाहेब शिंदे, लातूर विभाग उपाध्यक्ष गांजकर, लातूर विभाग महिला संघटक सौ ओमकला चवळे, लातूर आगार कार्याध्यक्ष शितल वाघमारे,लातूर आगार अध्यक्ष मारुती चाटे, लातूर आगार सचिव भीमाशंकर पाटील, लातूर आगार संघटक सचिव श्री नामदेव फड, लातूर आगार उपाध्यक्ष शिवहरी नागरगोजे, लातूर आगार उपाध्यक्ष धनंजय डोंगरे , लातूर विभागीय कार्यालय चालक
निळेकर,
लातूर विभागीय कार्यालय लिपिक हसोळीकर इ बहुसंख्या राष्ट्रीय कर्मचारी सेना लातूर विभाग पदाधिकारी उपस्थित होते. याप्रसंगी विभाग नियंत्रक यांना राष्ट्रीय कर्मचारी सेना विभागीय कार्यकारणी देताना लातूर शिवसेना जिल्हाप्रमुख शिवाजीराव माने यांनी आपले मनोगत व्यक्त केले, तसेच संघटनात्मक कामकाजासाठी व कर्मचारी यांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी विभाग नियंत्रक साहेबांनी योग्य ते सहकार्य करावे अशी त्यांनी विभाग नियंत्रक साहेबांना विनंती केली, तसेच विभाग नियंत्रक साहेबांनी सुद्धा साहेबांच्या विनंतीस मान देऊन संघटनात्मक , कर्मचारी अडी अडचणी सोडवण्यासाठी ते सदैव तत्पर आहेत अशी ग्वाही दिली
यानंतर लागलीच राष्ट्रीय कर्मचारी सेना विभागीय कार्यालय तसेच राष्ट्रीय कर्मचारी सेना विभागीय कार्यशाळा येथील नूतन लावलेल्या संघटनेच्या फलकाचे शिवसेना जिल्हाप्रमुख शिवाजीराव माने तसेच शिवसेना वाहतूक जिल्हाध्यक्ष श्री रोहित जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये फलकाचे अनावरण करण्यात आले.
अत्यंत दिमागदार आणि शिस्तबद्ध संघटनेच्या कार्यक्रमास बहुसंख्य संघटना पदाधिकारी उपस्थित होते.
यानंतर विभागीय सचिव हर्षद केंद्रे तसेच विभागीय कार्याध्यक्ष उमेश मोरे यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त माननीय विभाग नियंत्रक श्री जानराव तसेच माननीय शिवसेना जिल्हाप्रमुख शिवाजीराव माने आणि उपस्थित सर्व पदाधिकारी यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार केला आणि त्यांना *वाढदिवसानिमित्त* शुभेच्छा दिल्या
Tags
The महाराष्ट्र News